ट्रिनिटी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या अमरजित जाधवला मिळाले ७० लाखाचे पॅकेज

361

विपुल कदम याला कॅपजेमिनी कंपनीकडून १८ लाखाचे पॅकेज 

पुणे : येवलेवाडी येथील केजे शिक्षण संस्थेच्या ट्रिनिटी अभियांत्रिकी महाविद्यालयातील संगणक अभियांत्रिकीचा विद्यार्थी अमरजित जाधव याला अमेरिकास्थित बहुराष्ट्रीय कंपनीत ७० लाख वार्षिक पॅकेज असलेली नोकरी मिळाली आहे. तर संस्थेच्या केजे अभियांत्रिकी महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनचा विद्यार्थी विपुल कदम याला मलेशिया येथे कॅपजेमिनी कंपनीत १८ लाखाचे पॅकेज असलेली नोकरी मिळाली आहे. सहयोगी अधिष्ठाता प्रा. प्रतिभा चव्हाण, विभागप्रमुख प्रा. प्रमोद चव्हाण यांनी या दोन्ही विद्यार्थ्यांच्या जडणघडणीसाठी मेहनत घेतली आहे.

संगणक अभियंता असलेल्या अमरजित याने ट्रिनिटी महाविद्यालयातून अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे. केजे शिक्षण संस्थेने अमरजित याला ‘जीआरई’ व ‘टोफेल’ या परीक्षांची तयारी करण्यासाठी, तसेच अमेरिकेत मास्टर इन कम्प्युटर सायन्स (एमएस) करण्यासाठी मार्गदर्शन व अर्थसहाय्य पुरवले होते. विपुलने इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशनची पदवी घेतली आहे. संस्थेचे अध्यक्ष कल्याण जाधव, खजिनदार विनोद जाधव, व्यवस्थापकीय संचालिका हर्षदा जाधव, विभावरी जाधव, प्राचार्य डॉ. हरिभाऊ फाकटकर, डॉ. सुहास खोत यांनी दोन्हीही विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना मार्गदर्शन व सहकार्य करणाऱ्या सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.

कल्याण जाधव म्हणाले, “केजे शिक्षणसंस्था इन्फोसिस, विप्रो, पर्सिस्टेंट, झेन्सार, एक्सेंचर, सायबेज यांसारख्या १०० पेक्षा अधिक बहुराष्ट्रीय आणि नामांकित कंपन्यांशी संलग्न आहे. यात्यामुळे विद्यार्थ्यांना विविध प्रकल्पांच्या माध्यमातून इंटर्नशिपद्वारे प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळतो. या कंपन्यांच्या माध्यमातून कॅम्पस प्लेसमेंट्स होतात. समाजाच्या उन्नतीसाठी आणि विकासासाठी योगदान देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. गेल्या वर्षभरात संस्थेतील ४५० विद्यार्थ्यांना कॅम्पस प्लेसमेंटमधून नोकरी मिळाली आहे, ही गोष्ट आम्हाला प्रोत्साहित करणारी आहे.”

प्रा. प्रतिभा चव्हाण म्हणाल्या, “अभ्यासामधील अमरजित याची गती पाहून त्याला चांगल्या कंपनीमध्ये नोकरी मिळावी, यासाठी संस्थेकडून सतत साहाय्य करण्यात आले. ‘ट्रिनिटी’मध्ये विद्यार्थ्यांना करिअर घडविण्यासाठी प्रथम वर्षापासूनच मार्गर्शन केले जाते. व्यक्तिमत्व प्रशिक्षण, कौशल्याचे शिक्षण, क्रिडा यासह ग्रॅव्हिटी, गोकार्ट, रोबो-वॉर यासारख्या स्पर्धां घेण्यात येतात. आज संस्थेतून पदवी घेऊन बाहेर पडलेले हजारो विद्यार्थी अमरजित आणि विपुल यांच्याप्रमाणेच अनेक नामांकित कंपन्यात कार्यरत आहेत. याचा आम्हाला अभिमान वाटतो.”