१३ जुलै रोजी कचरा परिषदेचे आयोजन 

232

पुणे : पुणे शहराची कचरा समस्या, संभाव्य उपाय, नागरिकांचा सहभाग, स्वयंसेवी संस्था आणि प्रशासनाचे प्रयोग अशा अनेक पैलूंचा उहापोह करण्यासाठी आणि शहर स्वच्छ ठेवण्यासाठी कटिबद्ध होण्याचा निर्धार करण्यासाठी ‘शिवप्रजाराज्यम संघटना, ‘माय अर्थ फाउंडेशन, एन्व्हायर्नमेंट क्लब ऑफ इंडिया’ यांच्यातर्फे कचरा परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

पुणे श्रमिक पत्रकार संघ सभागृह येथे दिनांक १३ जुलै २०१९, दुपारी २ ते ५ या वेळेत ही परिषद होईल, अशी माहिती संयोजक अनंत घरत यांनी दिली.

रवींद्र धारिया (अध्यक्ष, वनराई), ज्ञानेश्वर मोळक (सहाय्यक आयुक्त, पुणे  मनपा), एड. गणेश सातपुते (पुणे महानगर परिषद), विवेक वेलणकर (सजग नागरिक मंच ), दत्तात्रय  देवळे (निवृत्त अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ ), यशोधन भिडे (अभिरुची), सचिन निवंगुणे (पुणे  जिल्हा रिटेल व्यापारी संघटना), ललित राठी (कचरा  व्यवस्थापन तज्ज्ञ ) या परिषदेत विचार मांडणार आहेत.

प्रारंभी कचरा समस्येवर पथनाट्य सादर करण्यात येणार आहे. शेवटी कचरा व्यवस्थापन, शहर स्वच्छतेची सामूहिक शपथ   घेण्यात येणार आहे.