अग्नेय गुरुकुलमध्ये पर्यावरण कार्यक्रम उत्साहात साजरा

318

प्रतिनिधी (केडगाव) : अरणगाव – दौंड रोड येथील अग्नेय गुरुकुल स्कूल मध्ये नुकताच पर्यावरण दिन साजरा करण्यात आला‌. त्या प्रसंगी हवामान तज्ञ प्रा. बी. एन. शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की  ‘झाड़े लावा झाड़े जगवा’ हा मंत्र आपण उपयोगात आणनेच योग्य आहे.संस्थेच्या संचालिका शैलजा लोटके यांनी ‘प्रदूषणापासून मुक्तता मिळणे आवश्यक आहे’ असे विचार व्यक्त केले.

याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष सुनील लोटके यांनी विद्यार्थ्यां बरोबर संवाद करताना झाडांचे महत्व विशद केले असून शाळेतील विद्यार्थ्यांनी भाषणे,गायन व नृत्य यातून पर्यावरण जागृतीचा संदेश दिला. या  कार्यक्रमास माजी  उपजिल्हाधिकारी दत्ता देवगावकर उपस्थित होते, तसेच महाराष्ट्र राज्य पर्यावरण व प्रदूषण निवारण मंडाळचे सचिव प्रमोद मोरे  यांनी वृक्षतोड़ झाल्यामुळे तापमान वाढलेले आहे असे सांगितले. कार्यक्रमाची सांगता प्रमुख पाहुणे, शिक्षक, विद्यार्थी व पालक यांच्या हस्ते वृक्षरोपणाने व सामुहिक पर्यावरण प्रतिज्ञेने करण्यात आली.

सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शाळेतील विद्यार्थी पार्थ लोढ़ा व ज्ञानेश्वरी डांगे व आभार पार्थ कुलकर्णी यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मनीषा लहारे व शाळेच्या समन्वयक परमजीत कौर, प्रकाश लगड, सर्व शिक्षक वृंद व शालेय विद्यार्थी उत्साहात कार्यशिल होते.