सलमानच्या बहीणीनं केलं दुसरं लग्न?

248

मुंबई : बॉलिवूडचा दबंग सलमान खानची लाडकी बहीण अर्पिता खाननं 18 नोव्हेंबर 2014 ला अभिनेता आयुष शर्मासोबत लग्न गाठ बांधली होती. त्यांचं लग्न हैदराबादच्या फलकनुमा पऐलेजमध्ये पार पडलं होतं. आयुष अर्पिताचं लग्न 2014मधील बॉलिवूड बहुचर्चित लग्नांपैकी एक ठरलं होतं. त्यानंतर आता आर्पिताचा कलीरे बांधलेला एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे या फोटोमध्ये अर्पिता कलीरे बांधून लग्नासाठी तयार असलेली दिसत आहे. त्यामुळे अर्पिता पुन्हा लग्न करतेय की काय अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. तसेच यावर तिचा नवरा आयुषनं केलेली एक कमेंट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.

अर्पितानं तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर तिच्या लग्नाचे काही फोटो शेअर केले. या फोटोंना अर्पितानं ‘निरागस थ्रोबॅक’ असं कॅप्शन दिलं आहे. हे फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. या फोटोवर तिची मैत्रिण मिनी माथुरनं, ‘मला असं कोणतंच लग्न आठवत नाही ज्यात मी तुझ्या लग्नाएवढं एंजॉय केलं आहे. फेरे झाल्यानंतरच्या पार्टीचे फोटो कुठे आहेत. अशी कमेंट केली आहे.’

याशिवाय अर्पितानं तिच्या हळद आणि मेहंदीचे फोटोही शेअर केले आहेत. ज्यात ती खूप सुंदर दिसत आहे. अर्पितानं हे फोटो शेअर केल्यानंतर प्रसिद्ध फोटोग्राफर विराल भयानीनं सुद्धा एक फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. ज्यावर अर्पिताचा पती आयुषची कमेंट चर्चेचा विषय ठरत आहे.

फोटोग्राफर विरल भयानीनं शेअर केलेल्या या फोटोमध्ये अर्पितानं व्हाइट लहंगा परिधान केला आहे. या फोटोला कॅप्शन देताना त्यानं लिहिलं, ‘अर्पिता खान तिच्या लग्नात खूप सुंदर दिसत होती.’ विरलच्या या फोटोवर अर्पिताचा पती आयुषनं, ‘काय… मी लांब असताना हिनं दुसरं लग्न केलं’ अशी कमेंट केली आहे. त्यामुळे हा फोटो सध्या चर्चेत आहे.

अर्पिता आणि आयुषचं 2014 मध्ये लग्न झालं होतं. त्यांचा अहिल नावाचा एक मुलगा सुद्धा आहे. अहिलं संपूर्ण खान कुटुंबीयांचा लाडका असून त्याचं मामा सलमान खानसोबत खास बॉन्डिंग नेहमीच दिसून येतं. त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.