गो रक्षणाच्या मुद्यावरून भाजप आमदाराचा राजीनामा

29

तेलंगणा : गो रक्षणाच्या मुद्यावरून तेलंगणातील भाजपा नेते आमदार टी राजासिंह लोध यांनी राजीनामा दिलाय. गोरक्षणावरून आपल्याला पाठिंबा मिळत नसल्याचे कारण सांगत त्यांनी पक्षाकडे आपला राजीनामा सोपवला आहे. सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओत राजा यांनी आपला राजीनामा पक्षाचे तेलंगणाचे प्रदेशाध्यक्ष लक्ष्मण यांच्याकडे पाठवला असल्याचे म्हटले आहे. राजा हे गोशामहल विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत.

राजा म्हणाले की, मी हिंदू धर्मातून आलेलो आहे आणि गो रक्षण करणे ही आमची प्राथमिकता आहे. राजकारण हे नंतर येते. गो रक्षणासाठी मी भाजपाचा राजीनामा दिला आहे. मी हा मुद्दा अनेकवेळा विधानसभेत उठवला पण पक्षाकडून मला कोणत्याही प्रकारचा पाठिंबा मिळाला नाही. गो रक्षणाच्या समर्थनासाठी मी आणि माझे पथक रस्त्यावर उतरेल आणि राज्यात सुरू असलेले कत्तलखाने बंद करतील, असा इशाराही त्यांनी दिला.

टी राजासिंह हे नेहमी आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. अनेकवेळा यासाठी पोलिसांनी त्यांना अटक केलेली आहे. गो रक्षणासाठी आम्ही जीव घेऊ नाहीतर जीव देऊ. आमचा एकच उद्धेश आहे की, कुठेही गो वध झाला नाही पाहिजे, असे म्हणत मला भाजपाला अडचणीत आणायचे नाही. त्यामुळेच मी पक्षाचा राजीनामा दिला असल्याचं त्यांनी सांगितले.