संत तुकोबारायांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

202

पुणे : खांद्यावर भगवी पताका, हातात टाळ-मृदुंग, मनामध्ये विठुरायाला भेटण्याची ओढ घेऊन निघालेल्या वैष्णवांनी तुकोबारायांची पालखी घेऊन काल पुणे शहरात विसावली आहे.

दरम्यान, भाविकांनी नाना पेठेतील निवडुंगा विठोबा मंदिरात संत तुकोबारायांचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली आहे.