तिला एडस्‌ आहे, असे सगळे म्हणायचे

230

भोजपुरीतील प्रसिद्ध ऍक्‍ट्रेस अंजना सिंहला सगळेजण “हॉट केक’ म्हणायचे. इतकी ती हॉट दिसायची. तिला फॅन्समध्येही याच नावाने ओळखले जायचे. आज ती भोजपुरीतील प्रस्थापित ऍक्‍ट्रेस आहे, पण एक काळ असा होता की तिला त्याकाळच्या ऍक्‍ट्रेस खूप त्रास द्यायच्या. तिला भोजपुरी इंडस्ट्रीमध्ये टिकूच द्यायचे नाही, असे तेव्हाच्या ऍक्‍ट्रेसनी ठरवून टाकले होते. स्वतः अंजना सिंहने एका इंटरव्ह्यूमध्ये हे सांगितले.

तेव्हाच्या ऍक्‍ट्रेसनी अंजनाबाबत खूप खोट्या बातम्या पसरवायला सुरुवात केली होती. “तिच्यापासून लांब राहा. तिला म्हणे एड्‌स झाला आहे.’ असे या जुन्या ऍक्‍ट्रेस खासगीत बोलताना एकमेकींना सांगायच्या. त्यामुळे सहाजिकच अंजनाच्या भोवतालची गर्दी कमी व्हायची. तिच्यासाठी येणाऱ्या सिनेमांच्या ऑफरवरही या अफवेचा परिणाम झाला होता, पण या ऍक्‍ट्रेसने अशी अफवा का पसरवली, याचे कारण मात्र अंजनाने सांगितले नाही.

अंजना सिंहने “भाग न बचे कोई’ या भोजपुरी सिरीयलमधून ऍक्‍टिंग करिअरला सुरुवात केली होती. त्यानंतर 2012 साली “एक और फौलाद’मधून भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले आहे. आपल्या करिअरच्या पहिल्या 2 वर्षात तिने तब्बल 25 भोजपुरी सिनेमांच्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. 2017 मध्ये लंडनमध्ये आयोजित झालेल्या भोजपुरी फिल्म फेस्टिव्हलमध्ये तिला “व्ह्युअर चॉईस ऍवॉर्ड’ मिळला होता. आता अंजना भोजपुरी ऍक्‍टर यश कुमारबरोबर विवाहबद्ध झाली आहे आणि वैवाहिक आयुष्य एन्जॉय करते आहे.