पत्रकारांच कवी संमेलन अन् पावसाची हजेरी

230

पुणे (प्रहार प्रतिनिधी) : पुण्यात (ता. २४ जून) होणाऱ्या पत्रकार कवी संमेलनाआधीच पावसाने पुण्यात जोरदार हजेरी लावली. शनिवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास जोरदार पाऊस कोसळला. त्यामुळे उकाडयाने हैराण झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळाला आहे.

दरम्यान पावसाळी वातावरणात पत्रकार चक्क कविता करणार असून पूना गेस्ट हाऊस येथे पत्रकार कवि संमेलन होणार आहे.

संमेलनातील मान्यवर मंडळींनमध्ये संमेलन अध्यक्ष सदानंद मोरे, प्रमुख अतिथी म्हणून नीला शर्मा, आणि संयोजक अभय व किशोर सरपोतदार हे असतील.

तर पत्रकारांमध्ये अभय जोशी (लोकमत), दीपक कुलकर्णी (लोकमत), लक्ष्मण मोरे (लोकमत), दीपक होमकर (लोकमत), मंगेश महाले (सकाळ), सुवर्णा येनपुरे (सकाळ), रूपाली अवचरे (सकाळ), सुषमा पाटिल (सकाळ), गोविंद वाकडे (न्यूज 18 लोकमत), मीनल म्हेत्रे (प्रभात), श्रीनिवास वारुंजीकर (पुढारी), उत्तमकुमार इंदोरे (महाराष्ट्र टाइम्स), अभिजीत थिटे (महाराष्ट्र टाइम्स), मंगेश कुलकर्णी (महाराष्ट्र टाइम्स), स्वप्निल बापट (आज का आनंद), प्रतिक राम गंगणे (पुणे प्रहार), वेणू शिंदे (मुक्त पत्रकार), मोहिनी सरदार (मुक्त पत्रकार), दीपक पाठक (महाराष्ट्र देशा) यांचा सहभाग असणार आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिल्पा देशपांडे हे करणार आहेत.

कार्यक्रमाचा तपशील :

कधी : सोमवार, दि. 24 जून 2019

कुठे : पूना गेस्ट हाऊस, लक्ष्मी रोड, दगडूशेठ गणपती मंदिरामागे, पुणे

वेळ : सायंकाळी 5 वाजता