नवोदितांसाठी अभिनय कार्यशाळेचे आयोजन

41

अभिनेते विक्रम गोखले, वर्षा उसगावकर, सुशांत शेलार देणार अभिनयाचे धडे 

पुणे – जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या मार्गदर्शनाखाली अभिनय कार्यशाळेचे आयोजित करण्यात आले आहे. ही कार्यशाळा  एच. आर झूम फिल्मस् यांनी भरवली असून २१ जून रोजी दु . १२ :०० ते २:००  या वेळेत गणेश कला क्रीडामंच, स्वारगेट, पुणे येथे पार पडणार आहे. अभिनयाबाबत विविध गोष्टींचे मार्गदर्शन जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्याकडून केले जाणार आहे. या कार्यशाळेद्वारे विध्यार्थांना अभिनेते विक्रम गोखले यांच्याशी थेट संवाद साधता येणार असून त्यांच्या तर्फे सर्व शंकांचे निरसन केले जाईल. विक्रम गोखले यांच्या बरोबर, अभिनेत्री वर्षा उसगावकर, सुशांत शेलार, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले असे चित्रपटसृष्टीतील दिग्गज मान्यवरांचे मार्गदर्शन देखील मिळणार आहे.

अभिनेते गोखले म्हणाले, सध्या अभिनयाचे प्रशिक्षण देणा – या अनेक कार्यशाळा आहेत. मात्र नवोदितांसाठी योग्य अभिनय शिकवणे गरजेचे आहे. ज्या नवोदित कलाकारांना अभिनय क्षेत्रात पदार्पण अथवा करिअर करायचे आहे. अशांना मार्गदर्शन मिळणार आहे. त्याच बरोबर चेह – यावरील हावभाव, अभिनयाचे विविध पैलू या एकेदिवशी कार्यशाळेत शिकवले जाणार आहेत. अभिनयक्षेत्रात पदार्पण करू इच्छिणाच्या तरुण कलाकारांना ही कार्यशाळा उपयुक्त ठरणार आहे. 

तर अभिनय क्षेत्रात पदार्पण व करिअर करणा – यांनी जास्ती जास्त संख्येने या कार्यशाळेत सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. कार्यशाळेबाबत अधिक माहिती हवी असल्यास ८८३०६०८८३९ यावर संपर्क क्रमांकावर send info असा संदेश पाठवावा. हा कार्यक्रम विनामूल्य असून काही जागा निमंत्रीत मान्यवरांसाठी राखीव आहेत. तरी इच्छुकांनी संपर्क करावा असे राजाराम कोरे यांनी आवाहन केले आहे.