बालगंधर्व येथे बाळासाहेब ठाकरे पुरस्कार प्रदान व शालोपयोगी वस्तूंचे वाटप

54

बुधवार दिनांक 19 जून 2019 रोजी सायंकाळी 5 ते 8 या वेळेत होणार कार्यक्रम

पुणे (प्रतिक गंगणे) : शिवसेना वर्धापन दिन आणि महाराणा प्रताप व छत्रपती राजर्षि शाहू महाराज यांच्या संयुक्त जयंती वर्षाप्रित्यर्थ वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे पुरस्कार व विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तुंचे वाटपाचा कार्यक्रम पुण्यातील बालगंर्धव रंगमंदिर येथे करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन बुधवार दि. 19 जून 2019 रोजी सायंकाळी 5 ते 8 या वेळेत बालगंधर्व रंगमंदीर पुणे येथे केले आहे. याच अनुषंगाने नवनिर्वाचित खासदार मा. श्री. गिरीष बापट तसेच साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळावर (मर्या.)  श्री. अमित गोरखे व क्रांतीगुरु लहुजी साळवे स्मारक समितीवर अध्यक्ष म्हणून नियुक्ती झालेले श्री. अशोक लोखंडे यांचा देखील जाहीर सत्कार करण्यात येणार आहे.

यावेळी मनोरंजनात्मक अशा संगीतमय मराठी गितांचा आणि नृत्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमास सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक तथा चित्रपट सृष्टीतील प्रतिष्ठीत व नामवंत मंडळी देखील या कार्यक्रास उपस्थितीत राहणार असून पुणे शहरातील तमाम समाज बांधवानी व शिवसैनीकांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थितीत राहण्याचे आव्हान कार्यक्रमाचे आयोजक अध्यक्ष माजी शिवसेना गटप्रमुख संतोष पवार आणि उपशाखा प्रमुख संजय पवार शिवसेना शाखा क्रमांक 17 मुंबई यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क : संतोष पवार : 9892454366 / प्रतिक गंगणे : 7276314142