एसटी प्रवाशांना लायन्स क्लबतर्फे रोपांचे वाटप

पुणे : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून दि इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ लायन्स क्लबच्या वतीने स्वारगेट बस स्थानकातील प्रवाशांना रोपांचे वाटप करण्यात आले. पांगारा, बकुळ, पळस, अशोक, पिंपळ, पाचारा, ताम्हण, सातवीण, जांभूळ आदी जातीची १००० रोपे प्रवाशांना देऊन वृक्ष लागवडीचे महत्व सांगण्यात आले. वृक्षमित्र रघुनाथ ढोले यांनी ही रोपे दिली. या उपक्रमात लायन्स क्लब ऑफ इको फ्रेंड्स, स्मार्ट सिटी, गॅलॅक्सी, औंध पाषाण, डिजिटल, लेकटाऊन, प्रभात, सहकारनगर, लोटस हे क्लब सहभागी झाले होते.

लायन्स क्लबच्या जिल्हा पर्यावरण विभागाचे प्रमुख अनिल मंद्रुपकर, किशोर मोहोळकर, कल्याण गुजराथी, सतीश धोका, विजय रोडे, प्रमोद उमरदंड, अनुराधा टल्लू, वीणा ढोले, अरुण कुलकर्णी, घनश्याम कलाटे, दादा सांगळे, रमेश पसरीचा यांच्यासह इतर अनेक सदस्यांनी प्रवाशांना रोपांचे वाटप केले. एसटीमध्ये जाऊन प्रवाशांना माहिती दिली. एसटीच्या विभागीय नियंत्रक यामिनी जोशी, वरिष्ठ आगार व्यवस्थापक सचिन शिंदे, आगार व्यवस्थापक प्रदीपकुमार कांबळे यांनी या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले.

Pune Prahar

पुणे प्रहार

error: Content is protected !!