Google ला मागे टाकत हि कंपनी जगात अव्वल

53

जागतिक बाजारात कार्यरत असणाऱ्या कंपन्यांचे मूल्यांकन करणाऱ्या ‘कॅन्टर’ या संस्थेने आघाडीच्या 100 कंपन्यांची यादी मंगळवारी प्रसिद्ध केली.

यानुसार , अॅमेझॉनच्या ब्रँड मूल्यात 52 टक्क्यांनी वाढ झाली असून ते 315 अब्ज अमेरिकी डॉलरवर पोहोचले आहे. यामुळे तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या अॅमेझॉनने गुगलला मागे सारत पहिल्या स्थानी झेप घेतली.

गुगलची तिसऱ्या क्रमांकावर घसरण झाली असून अॅपल दुसऱ्या स्थानी कायम आहे. अॅपल व गुगलचे ब्रॅँड मूल्य अनुक्रमे 309.5 आणि 309 अब्ज अमेरिकी डॉलर नोंदवले गेले.