स्त्री-शक्तीच्‍या प्रसारासाठी कोची ते दिल्ली बुलेट अभियान

145
  • फेडरल बँकेच्या महिला कर्मचाऱ्याचे पुण्यात स्‍वागत
टीम पुणे प्रहार : राष्ट्रीय स्तरावर लिंग समानतेचा प्रचार करण्याच्या व्यापक दृष्टीने फेडरल बँके ने सुरू केलेल्‍या खास महिला कर्मचाऱ्यांची एक रायडर टीम आज पुण्यात पोहचली. त्‍या  मोहिमेचे जोरदार स्‍वागत  फेडरल बँकेचे डेप्युटी वाईस प्रेसिडेंट आणि रिजनल हेड सोनी  चिरियाकंदथ आणि पुण्याच्या फेडरल बँकेचे कर्मचारी यांनी केले. या मोहिमेची सुरूवात 1 ऑगस्‍ट 2018 रोजी कोची येथून झाली होती. जी 20ऑगस्‍ट रोजी दिल्‍ली येथे पोहचेल.
20 दिवस चालणाऱ्या रॉयल एन्फिल्ड बुलेट्स मोटरसायकल मोहिमेची सुरूआत केरळ येथील डीजीपी श्रीलेखा यांनी हिरवा झेंडा दाखवून केली होती. मोहिमेत रायडर्स आणि बँकेचे कर्मचारी लिंग समानतेचा संदेश देईल. या 20 दिवसांमध्ये महिला सबलीकरण व स्त्री-शक्तीचा प्रचार प्रसार करणार आहेत. त्‍याद्वारे भगिनित्वाचा आत्मविश्वास वृद्धिंगत केला जाईल.
फेडरल बँक सामाजिक समस्यांबाबत अतिशय रस दाखवत असून बँकेच्या स्थापनेपासून अनेक अर्थपूर्ण हस्तक्षेप केले आहेत. बँकेने चांगली कामगिरी बजावून व्यापारात उंची तर गाठली, शिवाय समाजात विस्तारलेल्या मुळांमुळे तिची खोलवर प्रगती शक्य झाली. लिंग समानता हे नैतिक मूल्य आहे, ज्याचा अंगीकार बँक करत असून त्याचा प्रचार सुरू आहे. फेडरल बँकेचे 40 टक्के कर्मचारी या महिला आहेत. त्यांना कार्यालयीन ठिकाण हे समानतावादी वाटते. ज्यामुळे त्यांचे मनोबल उंचावलेले राहते. बँकेतील महिलांचे प्रतिनिधित्व हे त्यांचे संचालक मंडळ, वरिष्ठ ते मध्यम व्यवस्थापकीय टीम आणि शाखा करत असतात. या महिलांनी बँकेसाठी दिलेले योगदान निश्चितच वाखाणण्याजोगे आहे. सर्वसाधारण सामाजिक वातावरणात महिलांचे संख्याबळ धडाडीची कामे करत आहेत.