अभिनेता सुभाष यादव यांना समाजभूषण पुरस्कार : कार्यक्रमाचे मानधन हृदय शस्त्रक्रियेसाठी

15

खेड (वार्ताहर) : अभिनेते, हास्यसम्राट सुभाष यादव यांना नुकतेच समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. खेड (ता. कर्जत) येथील ‘संकल्प मैत्री ग्रुपच्या’ वतीने त्यांचा ‘कॉमेडी तड़का’ हा गाजलेला शो आयोजित करण्यात आला होता. यावेळी या कार्यक्रमाचे मानधन सुभाष यादव यांनी त्याच गावातील गणेश सुभाष काळे यांच्या हृदयावरील शस्त्रक्रियेसाठी मदत म्हणून देवून सामजिक बांधीलकीची जाण ठेवली. गणेश काळे (वय-30) यांची आर्थिक परस्थिती अतिशय बेताची आहे. यादव यांच्या या दिलदार कृतीने सर्व गावकऱ्यांना जिंकून घेतले.

यावेळी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सुभाष यादव यांनी अभिनय क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रातही मोलाची कामगिरी पार पाडली आहे. आपल्या ‘कॉमेडी तड़का’ या कार्यक्रमातून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला पोट धरून हसवायला भाग पाडले. ‘रोल नंबर 18’ या चित्रपटात प्रमुख नायक भूमिका साकारली होती. ‘कॉमेडीचा बादशाह’ अशी शाबसकीची थाप मिळवत असताना त्यांनी अनेकांना आत्महत्या करण्यापासून परावृत्त केल्याची अनेक उदाहरणे आहेत. तसेच नुकतेच एका रुग्नाचा कापला गेलेला हात सुद्धा त्यांच्या प्रयत्नाने वाचला.

त्यांच्या या अभिनय व सामजिक कार्याचा गौरव करत आता पर्यन्त महाराष्ट्रातील अनेक नामांकित संस्थानी सुमारे 42 राज्यस्तरीय पुरस्काराने त्यांना सन्मानित केले आहे. यावेळी पं. सदस्य हेमंत मोरे, उद्योजक निलेश निकम, खेडच्या सरपंच अमृता वाघमारे, विजय सोनवणे, सचिन मोरे, सोमनाथ वाघमारे, दिनेश दळवी, अक्षय रनवरे, तुषार मोरे, अक्षय वाघमारे, मुकुल मोरे, संकेत कांबळे, निलेश मोरे व हजारो प्रेक्षक उपस्थित होते.