आज जो जिंकणार तो जग्गजेता होणार, अशी आहे आकडेवारी

150

भारत आणि आस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यांचे निकाल आणि वर्ल्ड कपचे विजेते यांच्यात एक अनोखा योगायोग आहे. 2007 चा अपवाद वगळता 1999 ते 2015 च्या वर्ल्ड कपपर्यंत जितके वर्ल्ड कप झाले त्यात या दोन्ही संघामध्ये झालेल्या सामन्यात ज्यांनी विजय मिळवला त्यांनी वर्ल्ड कप जिंकला आहे.

1999 च्या वर्ल्ड कपमध्ये मोहम्मद अझरुद्दीन कर्णधार असताना भारताला ऑस्ट्रेलियाने पराभूत केलं होतं. त्यानंतर ऑस्ट्रेलियानं विजेतेपद पटकावलं होतं.

2003 च्या वर्ल्ड कपमध्ये भारताने फायनलला धडक मारली. तिथे रिकी पाँटिंगच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने भारताला पराभूत करून विजेतेपद पटकावलं होतं. त्याआधी वर्ल्ड कपमध्ये झालेल्या भारताविरुद्धच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला होता.

2007 च्या वर्ल्ड कपमध्ये भारत साखळी फेरीतच बाहेर पडला होता. त्यामुळे भारत ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना झाला नव्हता.

2011 च्या वर्ल्ड कपमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात क्वार्टर फायनलला लढत झाली होती. या सामन्यात भारताने विजय मिळवला होता. त्यानंतर धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने दुसऱ्यांदा वर्ल्ड कपवर नाव कोरलं होतं.

2015 मध्ये ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमध्ये झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारताने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. तिथं घरच्या मैदानावर खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियाने भारताला पराभूत केलं आणि त्यानंतर वर्ल्ड कपही जिंकला.

आतापर्यंतचे भारत ऑस्ट्रेलियाचे रेकॉर्ड आणि दोन्ही संघातील सामन्यानंतर वर्ल्ड कपमधील निकाल पाहता आजच्या सामन्यात कोण विजयी होणार याची उत्सुकता लागून राहिली आहे_