स्वतःच्या चुकांमुळे या ४ लोकप्रिय स्टार नी करिअर संपविले

12

बाॅलिवुड मध्ये यशस्वी करिअर करण्यापेक्षा या इंडस्ट्री मध्ये प्रवेश मिळणे अवघड आहे असे मानले जाते तरीही अनेक लोकांना थोडाफार स्ट्रगल केल्यावर बाॅलिवुड मध्ये प्रवेश भेटतो यशही मिळते पण केलेल्या काही चुकांमुळे त्यांना इंडस्ट्री मध्ये चित्रपट मिळत नाही. आज आपण ४ अश्या स्टार बद्दल बोलणार आहोत जे लोकप्रिय तर झाले पण स्वतः केलेल्या अनेक चुकांमुळे त्यांना आपले स्टारपद गमवावे लागले.

१. विवेक ओबेरॉय

कंपनी, साथिया आणि दम सारखे हिट चित्रपट दिल्यानंतर विवेक आॅबेराॅय याला बाॅलिवुड मध्ये स्टारपद मिळू लागले होते. क्युं हो गया ना या चित्रपटात ऐश्वर्या राय बरोबर काम केल्यानंतर दोघांच्या अफेयर च्या चर्चा वाढल्या आणि त्यानंतर पत्रकार परिषद बोलवून विवेकने सलमान विरोधात जे तोडांला येईल ते बोलला. मग अनेक निर्मात्यांनी इच्छा असून सुद्धा सलमानच्या दबावामुळे त्याला चित्रपटात काम दिले नाही आज तो फुटकळ काम करत आहे.

२. राहुल राॅय

आशिकी या सुपरहिट चित्रपटातून राहुल राॅय ने बाॅलिवुड मध्ये प्रवेश केला तो स्टार झाला खरा पण चित्रपट केवळ गाण्यांमुळे यशस्वी झाला हे लोकांना नंतर लक्षात आले कारण त्याच्यामध्ये अभिनय गुण अजिबात नव्हते व त्याने त्यात सुधारणा केलीच नाही पण तरीही तो एका मागोमाग एक खराब चित्रपटात साईन करत गेला व लवकरच राहूल राॅय ला बाॅलिवुड मध्ये एक फ्लॉप स्टार बोलू लागले.

३. मंदाकिनी

‘राम तेरी गंगा मैली’ प्रंचड गाजला त्यावेळेस मंदाकिनी ची लोकप्रियता माधुरी दिक्षित पेक्षा जास्त वाढत होती पण एका क्रिकेट सामन्यात कुख्यात डाॅन दाऊद सोबत ती दिसली आणि तीचे करिअर संपले. अंडरग्राऊंड शी संबध असल्याचा संशय घेऊन पोलीसांना तीची चौकशी करण्यास सुरवात अनेक मोठ्या निर्मात्यांनी भितीमुळे मंदाकिनी सोबत चित्रपट करणे बंद केले.

४. अमिषा पटेल

‘कहो ना प्यार है ‘ या चित्रपटातून दमदार एंट्री घेतल्यानंतर गदर सारखा ब्लाॅकबास्टर दिल्यानंतर तीला यशाची नशा चढली. आपला प्रत्येक चित्रपट हीट होईल असा विचार करुन तीने खराब स्क्रिप्टला सुध्दा होकार देण्यास सुरवात केली त्यानंतर तीचे चित्रपट फ्लाॅप होत गेले. वेगवेगळ्या अफेयर मुळे तीने चर्चेत राहण्याचा प्रयत्न केला पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती.