लग्नानंतर विघ्न; विवाह समारंभावरुन परतताना दोन पिकअपचा भीषण अपघात, २ ठार, ९ जखमी

143

लातुर – दोन पिकअपची समोरासमोर धडक झाल्याने भीषण अपघात झाल्याची घटना घडली. या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. बार्शी- लातुर रोडवरील मुरुड अकोला जवळ दुपारी ४ च्या सुमारास ही घटना घडली. यातील एक पिकअपमध्ये लग्न समारंभ उरकून माघारी येणारे वऱ्हाड होते.

accident

अपघातग्रस्त पिकअप

या भीषण अपघातात दोन्ही पिकअपचा चक्काचुर झाला आहे. तुषार दिलीप कुटे (१४) व मंगल प्रकाश जावळे (४३) अशी मृतांची नावे आहेत.

लातूर तालुक्यातील चाटा भोपळा या गावात विवाह समारंभ होता. या कार्यक्रमासाठी ढोकी (जि. उस्मानाबाद) जवळील सातेफळ सौंदना येथील वऱ्हाड पिकअपने (एम.एच.२५ पी. ४३०७) लग्नासाठी आले होते. दुपारचे लग्न उरकून वऱ्हाडी सातेफळकडे परतत असताना मुरुड अकोला जवळील पुलावर बार्शीकडून येणाऱ्या पिकअपने वऱहाडाच्या पीकअपला जोराची धडक दिली. अपघातात दोन्ही पिकअपचा चक्काचुर झाला आहे.

या अपघातात केशवबाई ज्ञानदेव बराते, मंगल हरिश्चंद्र कुटे, उद्धव भानुदास जावळे, आशा सतीश कुटे, पांडुरंग लक्ष्मण कुटे, हरिशचंद्र तुकाराम कुटे, विमल कुटे, आशाबाई विनायक कुगाडे, राजेंद्र पंढरी कुटे हे जखमी असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गातेगाव पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झाली आहे.