अशी कामगिरी करणारे नरेंद्र मोदी ठरले भारताचे एकमेव पंतप्रधान!

172

नरेंद्र मोदींचा शपथविधी सोहळा राष्ट्रपती भवनात पार पडला. यावेळी नव्या मंत्रिमंडळात अरुण जेटली आणि सुषमा स्वराज नसतील तर अमित शहा यांचा समावेश असणार आहे. अमित शहा यांना अर्थमंत्रिपद मिळू शकेल, अशी जोरदार चर्चा आहे. शपथविधी आधी मोदींनी गुरुवारी (30 मे) शहिदांना आदरांजली वाहिली. महात्मा गांधी आणि अटलजींच्या स्मृतीस्थळालाही अभिवादन केले.

नरेंद्र मोदींनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या समाधीला अभिवादन केल्यानंतर शहिदांना आदरांजली वाहिली. यावेळी लष्कर प्रमुख बिपीन रावत, नौदल प्रमुख सुनिल लांबा आणि हवाई दलाचे उपप्रमुख एअर मार्शल राकेश सिंह भदुरिया उपस्थित होते. राष्ट्रपती भवनात संध्याकाळी सात वाजता विविध पक्षांचे दिग्गज नेते, कलाकार, उद्योगपती यांच्या उपस्थितीत शपथविधी सोहळा रंगला. लालकृष्ण अडवाणी, सुषमा स्वराज, सोनिया गांधी, राहुल गांधी, मनमोहन सिंह, उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस यासारख्या नेत्यांसह अंबानी कुटुंब, शाहरुख खान, करण जोहर, कंगना राणावत यासारखे कलाकार उपस्थित होते.

भारताच्या शेजारी राष्ट्रांचे प्रमुख, महासत्तांचे राजदूत, देशातील प्रमुख नेतेमंडळी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर, सेलिब्रिटी यांच्यासह सुमारे ६ हजार पाहुणे या सोहळ्याला उपस्थित होते. २०१४ मध्ये नरेंद्र मोदींनी पहिल्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली, तेव्हा पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली होती. परंतु, यावेळी SAARC ऐवजी BIMSTEC संघटनेतील राष्ट्रांच्या प्रमुखांनाच आमंत्रित केलं.

अशी कामगिरी करणारे मोदी ठरले पहिले पंतप्रधान-

६.५७ वाजता नरेंद्र मोदी राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात दाखल झाले. पुढच्या पाचच मिनिटांत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं आगमन झालं आणि राष्ट्रगीताची धून वाजली. त्यानंतर ७.०४ च्या ठोक्याला नरेंद्र दामोदरदास मोदींचं नाव पुकारण्यात आलं आणि काही सेकंदातच ‘मैं नरेंद्र दामोदरदास मोदी ईश्वर की शपथ लेता हूं…’ अशी शपथ ऐकताना सगळेच भारावले. नरेंद्र मोदी हे एकमेव असे पंतप्रधान ठरले आहेत जे ३ वेळा मुख्यमंत्री राहिले आणि २ वेळा पंतप्रधानपदाची शपथ घेतली.

राजनाथ सिंह, अमित शाह, नितीन गडकरी, सदानंद गौडा, निर्मला सीतारमन यांच्यासह 58 मंत्र्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शपथ दिली. महाराष्ट्रातून शिवसेना खासदार अरविंद सावंत, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, रामदास आठवले यांच्यासह सात मंत्र्यांनी शपथ घेतली.