वाहतूक नियम पाळणाऱ्यांना ‘व्हाऊचर गिफ्ट ‘

152

वाहतूक पोलीस सुरू करणार नवी योजना

पुणे : संपूर्ण वाहतूक नियमांचे पालन करणाऱ्या आणि वाहनावर कुठलाही दंड प्रलंबित नसलेल्या वाहनचालकाला कारवाईदरम्यान पोलिसांनी अडविल्यास त्याला ‘व्हाऊचर गिफ्ट ‘ देण्यात येणार आहे. वाहतूक पोलिसांकडून ही योजना सुरू करण्यात येणार आहे. यावरील काम अंतिम टप्प्यात असून, पुढील आठ ते दहा दिवसांत ही योजना प्रत्यक्षात येणार असल्याचे वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आले. बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईसाठी चौकाचौकात वाहतूक पोलीस कार्यरत आहेत. नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांना अडवून त्यांच्याकडून दंड वसूल केला जातो. यासाठी नुकतेच वाहतूक पोलिसांनी नाकाबंदी मोहीम सुरू केली असून, ठिकठिकाणी कारवाई सुरू आहे. अनेकदा अशा कारवाईवेळी अडविलेल्या वाहनचालकावर कुठल्याही प्रकारचे चलन प्रलंबित नसते. तसेच त्याच्याकडे लायसन्स, गाडीची आवश्यक कागदपत्रेही असतात. अशा प्रकारे सर्व वाहतूक नियम पाळणाऱ्या ‘वाहन  चालकांना’ गिफ्ट देऊन कौतुक करण्यात येणार आहे.