वाढदिवस हा वाढदिवसासारखा साजरा व्हावा : कृष्णा देशमुख

सर्व खर्चांना आळा घालत जपले सामाजिक भान

पुणे (प्रहार प्रतिनिधी) : वाढदिवस म्हटले की तरूणाईचा जल्लोष आला. आणि त्या जल्लोषात तरूणाई काहीही करत असते. मग ते भर रस्त्यात केक कापून धिंगाणा असेल किंवा गाणी लावून भर रस्त्यात नाच-गाणी असतील. आणि आता तर साध्यातला साधा माणूस देखील वाढदिवसाला आपला फ्लेक्स प्रत्येक चौकात असावा म्हणून धडपड करत असतो. मग त्याची कार्ये शून्य का असेनात.

एकीकडे उपासमारीने अनेक बालक दगावतात. आणि दुसरीकडे हे असे पार्ट्यांचे प्रकार राजरोसपणे चालू असतात. पण ह्या सगळ्यांना उत्तर म्हणून पुण्यात एक अनोखा वाढदिवस साजरा करण्यात आला.

सर्व खर्चांना आळा घालत आणि सामाजिक भान जपत पुणे येथील ममता फाऊंडेशन, गुजर निंबाळकर वाडी कात्रज येथे एच.आय.व्ही. ग्रस्त अनाथ मुलांसोबत महाराष्ट्र पत्रकार संघाचे पुणे शहर अध्यक्ष कृष्णा के. देशमुख यांनी आपला वाढदिवस साजरा केला.

वाढदिवसा निमित्त शैक्षणिक साहित्य, खाऊ, केक, चिप्स वाटून एक सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न त्यांनी केला.

यावेळी मुद्रा ग्रुपचे चेअरमन उमेश पवार, संत योगीनाथ महाराज, महाराष्ट्र पत्रकार संघाचे प्रकाश यादव, वेल्हा तालुका अध्यक्ष किरण जाधव, उद्योजक निलेश ताठे, युवा सांसद न्युजचे संपादक धनराज गरूड, अविनाश गायकवाड, अभिनेता राहुल बळवंत, पत्रकार चैतन्य मांजरेकर, संदिप कंदरे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष बाजीराव काका, नाशिक महाराज ग्रुपचे अध्यक्ष सुकृत कुशारे, महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हा पुणे सदस्य राहुल बांदल, राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा महिला नेत्या कोमल ताई नवघणे, रूपाली बांदल, आय.पी.एस. अकॅडमीचे चेअरमन सचिन थोरात, भाजपा महिला आघाडी कोथरूड विभाग उपप्रमुख माधुरी खामकर, प्रभाकर कोल्हे, ग्रामीण कवी अभिजीत जाधव, अ‍ॅड. सागर काळे, प्रहार जनशक्ती पक्षाचे नयन पुजारी, ममता फाऊंडेशनच्या संचालिका शिल्पा बुडूक, बजाज फायनान्सचे मॅनेजर अभिजीत सावंत, आकाश आहेर, शुभम मस्के, धीरज रमेश महांगर यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

‘‘वाढदिवस हा साधाच साजरा व्हावा असं नेहमी वाटत राहतं. फ्लेक्सबाजी करून वाढदिवस करण्याला काहीच अर्थ नसतो. फ्लेक्स बाजी करण्यात जो पैसा वाया जातो तो जर अनाथ आश्रम तसेच कुठंतरी देणगी स्वरूपात दिला तर तोच खरा वाढदिवस साजरा झाला असं समजाव.’’ – कृष्णा देशमुख, पुणे

Pune Prahar

पुणे प्रहार

error: Content is protected !!