चाकण बाजारात कांदा, टोमाटो व वांग्याचे भाव तेजीत

कारली, काकडी व फ्लॉवरची किरकोळ आवक : एकुण उलाढाल २ कोटी, ७० लाख रुपये

चाकण (अशोक टिळेकर) :

खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटयार्ड मध्ये कांदा, टोमाटो व वांग्याचे भाव तेजीत राहिले आहेत. तर कारली, काकडी व फ्लॉवरची किरकोळ आवक झाली. जळगाव भूईमुग शेंगा, लसून, फ्लॉवर व कारल्याचे भाव स्थिर राहिले आहेत. चाकण बाजारात या आठवड्यात कांदा, बटाटा, टोमाटो, फ्लॉवर, वांगी, कारली, दुधीभोपळा व काकडी यांची आवक घटली. कांद्याची या आठवड्यात आवक घटल्याने भाव तेजीत राहिले आहेत. हिरवी मिरची, कोबी व भेंडीची विक्रमी आवक झाली. चाकणला पालेभाज्यांच्या बाजारात मेथी, शेपू व पालक भाजीची आवक घटली. कोथिंबीरीची मात्र भरपूर आवक झाली. चाकणला गुरांच्या बाजारात या आठवड्यात जर्शी गाई, बैल व म्हैस यांच्या संख्येत मोठी वाढ झाली. तर शेळ्या – मेंढ्यांची संख्या स्थिर राहूनही त्यांचे भावही स्थिर राहिले आहेत. एकुण उलाढाल २ कोटी, ७० लाख रुपये झाली. 

चाकण बाजारात कांद्याची एकूण २ हजार ७७८ क्विंटल आवक झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक ३ हजार ६४९  क्विंटलने घटल्याने कांद्याच्या भावात १०० रुपयांची वाढ झाली. कांद्याचा कमाल भाव १,००० रुपयांवरून १,१०० रुपयांवर पोहचला. तळेगाव बटाट्याची एकूण आवक ९६० क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक १४३ क्विंटलने घटूनही बटाट्याच्या भावात १०० रुपयांची घट झाली. बटाट्याचा कमाल भाव १ हजार २०० रुपयांवरून १,१०० रुपयांवर स्थिरावला. जळगाव भुईमुग शेंगांची एकुण आवक ४ क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक १ क्विंटलने वाढल्याने कमाल भाव ५ हजार ५०० रुपयांवर स्थिरावला. लसणाची एकूण आवक ७ क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक १ क्विंटलने वाढल्याने लसणाचा कमाल भाव ४ हजार रुपयांवर स्थिरावला. 

चाकण बाजारात हिरव्या मिरचीची एकूण आवक ४७० क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक ५ क्विंटलने वाढली. हिरव्या मिरचीला ५ हजार ते ६ हजार रुपये असा कमाल भाव मिळाला. 

राजगुरूनगर येथील पालेभाज्यांच्या मुख्य बाजारात मेथीची १ लाख, ४० हजार जुड्यांची आवक होऊन मेथीला ५०१ ते ३,००० रुपये प्रतीशेकडा जुड्यांना भाव मिळाला. कोथिंबीरीची १ लाख, ९० हजार जुड्यांची आवक होऊन प्रतिशेकडा जुड्यांना २०१ ते २,६०० रुपये एवढा भाव मिळाला. शेपूची ८० हजार जुड्यांची आवक होवून प्रतिशेकडा शेपुला १०१ ते १,३०० रुपये असा भाव मिळाला आहे. राजगुरुनगर व शेलपिंपळगाव येथील पालेभाज्यांच्या बाजारात पालक भाजीची काहीच आवक झाली नाही. चाकण बाजारात मेथीची २ हजार ६८० जुड्यांची आवक होवून मेथीला १,००० ते १,८०० रुपये प्रतिशेकडा जुड्यांना भाव मिळाला. कोथिंबीरीची ३१ हजार जुड्यांची आवक होवून कोथिंबीरीला १,००० ते १,६०० रुपये प्रतिशेकडा भाव मिळाला. शेपूची ४ हजार ५२० जुड्यांची आवक होवून प्रतिशेकडा शेपुला ८०० ते १,००० रुपये एवढा भाव मिळाला. पालक भाजीची ५ हजार ४८० जुड्यांची आवक होवून पालक भाजीला ५०० ते ७०० रुपये असा भाव मिळाला. 

शेलपिंपळगाव येथील उपबाजारात शेपू व पालक भाजीची काहीच आवक झाली नाही. येथील बाजारात मेथीची २ हजार, ५००  जुड्यांची आवक होऊन मेथीला ६०० ते १,१०० रुपये प्रतीशेकडा जुड्यांना भाव मिळाला. कोथिंबीरीची २ हजार जुड्यांची आवक होऊन प्रतिशेकडा जुड्यांना ४०० ते ९०० रुपये एवढा भाव मिळाला. 

शेतीमालाची एकूण आवक व बाजारभाव पुढील प्रमाणे :  कांदा – एकूण आवक – २,७७८ क्विंटल. भाव क्रमांक १. १,१०० रुपये,  भाव क्रमांक  २. ८५० रुपये,  भाव क्रमांक ३. ४५० रुपये,  बटाटा – एकूण आवक – ९६० क्विंटल. भाव क्रमांक १. १,१०० रुपये,  भाव क्रमांक २. १,००० रुपये, भाव क्रमांक ३. ८०० रुपये.

फळभाज्या : चाकण येथील फळभाज्यांच्या बाजारात एकूण आवक डागांमध्ये व प्रती १० किलोंसाठी डागांना मिळालेले भाव पुढील प्रमाणे :-

टोमॅटो – ८५४ पेट्या ( १,००० ते १,८०० रू. ), कोबी – ३२८ पोती ( ४०० ते ८०० रू. ), फ्लॉवर – ३५८ पोती ( १,००० ते १,५०० रु.), वांगी – ४६५ पोती ( १,००० ते २,५०० रु.), भेंडी – ५१० पोती ( २,५०० ते ३,५०० रु.), दोडका – २६५ पोती ( ३,५०० ते ४,५०० रु.), कारली – २१८ डाग ( ३,५०० ते ४,५०० रु.), दुधीभोपळा – २४२ पोती ( १,००० ते २,००० रु.), काकडी – ३५१ पोती ( ६०० ते १,२०० रु.), फरशी – ३२ पोती ( ६,००० ते ८,००० रु.), वालवड – ३१६ पोती ( २,५०० ते ५,००० रु.), गवार – २९२ पोती ( १,५०० ते २,५०० रू.), ढोबळी मिरची – ३४० डाग ( २,५०० ते ३,५०० रु.), चवळी – २४ पोती ( ४,००० ते ५,००० रुपये ), वाटाणा – १५० पोती ( ५,००० ते ६,००० रुपये ), शेवगा – १७२ पोती ( २,५०० ते ३,५०० रुपये ), गाजर – ६० पोती ( १,००० ते १,४०० रु.),

पालेभाज्या :  चाकण येथील पालेभाज्यांच्या मुख्य बाजारात पालेभाज्यांची एकूण आवक जुड्यांमध्ये व प्रती शेकडा जुड्यांना मिळालेले भाव पुढील प्रमाणे : –

मेथी – एकूण २ हजार ६८० जुड्या ( १,००० ते १,८०० रुपये ), कोथिंबीर – एकूण ३१ हजार जुड्या ( १,००० ते १,६०० रुपये ), शेपू – एकुण ४ हजार ५२० जुड्या ( ८०० ते १,००० रुपये ), पालक – एकूण ५ हजार ४८० जुड्या ( ५०० ते ७०० रुपये ).

जनावरे :  चाकण येथील जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या ५० जर्शी गायींपैकी ३० गाईची विक्री झाली. ( १५,००० ते ६०,००० रुपये ), २१० बैलांपैकी १६० बैलांची विक्री झाली.( १०,००० ते ३०,००० रुपये ), ११० म्हशींपैकी ८० म्हशींची विक्री झाली. ( २०,००० ते ७०,००० रुपये ), शेळ्या – मेंढ्यांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या ९,८२५ शेळ्या – मेंढ्यापैकी ८,८७० मेंढ्यांची विक्री होऊन त्यांना १,३०० ते १५,००० रुपये इतका भाव मिळाला. 

Pune Prahar

पुणे प्रहार

error: Content is protected !!