अक्षय कुमारचे नागरिकत्वावर स्पष्टीकरण

मुंबई- अभिनेता अक्षय कुमारच्या नागरिकत्वावरून बऱ्यावेळा वाद किंवा चर्चा होतच असतात. त्यातच आता त्याने त्याच्या नागरिकत्वाच्या मुद्द्यावरुन पहिल्यांदाच जाहीर स्पष्टीकरण दिले आहे. अक्षय कुमारने मतदान न केल्यामुळे त्याच्या देशप्रेमावरच शंका व्यक्त करण्यात आली होती, त्यानंतर तो म्हणाला-”पण मी गेल्या सात वर्षात माझ्याकडे कॅनडाचा पासपोर्ट असल्याचे कधीही लपवले नाही, मग आत्ताच हा सर्व वाद का काढला जातोय, असा सवाल अक्षय कुमारने विचारलाय. शिवाय मी देशासाठी माझ्या वतीने योगदान देत राहिल”, असेही अक्षयने म्हटले आहे.

”माझ्या नागरिकत्वाबाबत बिनबुडाच्या आणि नकारात्मक गोष्टी का पसरवल्या जात आहेत हे मला समजत नाहीये. माझ्याकडे कॅनडाचा पासपोर्ट आहे हे मी गेल्या सात वर्षात कधीही लपवले नाही किंवा नकारही दिलेला नाही. त्याचप्रमाणे मी गेल्या सात वर्षात कधीही कॅनडाला गेलेलो नाही हे देखील तेवढेच खरे आहे. मी भारतात काम करतो आणि सर्व प्रकारचे करही भारतातच भरतो. या गेल्या काही वर्षांमध्ये माझं देशाविषयीचे प्रेम सिद्ध करण्याची वेळ माझ्यावर कधीही आलेली नाही. पण गरज नसताना माझ्या नागरिकत्वाचा मुद्दा मध्ये ओढला जात आहे, हे पाहून दुःख होतंय. हा मुद्दा वैयक्तिक, कायदेशीर, अराजकीय आणि इतरांशी काहीही संबंध नसलेला आहे. माझा भारत आणखी मजबूत बनवण्यासाठी मी कायम योगदान देत राहिन एवढेच सांगतो,” असे स्पष्टीकरण अक्षयने दिले.

अक्षय कुमार नेमका कोणत्या देशाचा नागरिक?

मानद नागरिकत्व हे एखाद्या देशाकडून सन्मान म्हणून दिले जाते. मानद नागरिकत्व दिले म्हणजे सामान्य नागरिकत्वाचे अधिकार मिळत नाहीत. म्हणजेच एखादा व्यक्ती कॅनडाचा Honorary Citizenship असेल तर त्यालाही कॅनडात जाण्यासाठी व्हिजा आवश्यक असेल.

अक्षय कुमार हा Overseas Citizenship of India आहे की भारतीय नागरिक आहे, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर केंद्रीय गृहमंत्रालयाने यापूर्वीच आरटीआयला उत्तर दिले आहे. तो Overseas Citizenship of India नसल्याचे गृहमंत्रालयाकडून सांगण्यात आले होते. ऑगस्ट 2017 मध्ये आणखी एका प्रश्नाला उत्तर देताना गृहमंत्रालयाने स्पष्ट केले, की अक्षय कुमार हा भारतीय नागरिक आहे.

Pune Prahar

पुणे प्रहार

Leave a Reply

Your email address will not be published.

twelve − eleven =

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: Content is protected !!