खालुंब्रे येथील अपघातात ठार झालेल्या पाच जणांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

234

चाकण : इरटीका गाडी घेवून भरधाव निघालेल्या चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी रस्त्यातील दुभाजकाला धडकून इरटीका गाडी  रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला सुसाट वेगात घसरत गेल्याने पलटी होवून समोरून येणाऱ्या तीन दुचाकींना धडकून शिंदे वासुली चौक ते एचपी चौक या रस्त्यावरील खालुंब्रे ( ता. खेड ) गावच्या हद्दीतील केएसएच लॉजिस्टिक कंपनीच्या गोडाऊन समोर झालेल्या भीषण अपघातात वेगवेगळ्या तीन दुचाकी वरील ठार झालेल्या पाच जणांवर रात्री उशिरा अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात खालुंब्रे ( ता. खेड ) गावच्या हद्दीत प्रथमच अशी धक्कादायक घटना घडल्याने चाकण औद्योगिक वसाहतीत हळहळ व्यक्त केली जात आहे.

चंद्रशेखर सुरजलाल विश्वकर्मा ( वय – ३८ वर्षे, सध्या रा. भोसरी, ता. हवेली,), सुनील परमानंद शर्मा ( वय – ४३ वर्षे, सध्या रा. भोसरी, मूळ रा. हरियाना,), दीपनारायण हरिवंश विश्वकर्मा ( वय – २४ वर्ष, रा. मोरे वस्ती, चिखली, ता. हवेली,), सत्यवान पांडे ( वय – ४५ वर्षे, रा. मोरे वस्ती, चिखली, ता. हवेली,) व सर्वज्ञ संजय विश्वकर्मा ( वय – ३५ वर्षे, रा. चिखली, ता. हवेली,) अशी या भीषण अपघातात जागीच ठार झालेल्या दुचाकीवरील पाच जणांची नावे आहेत. वरील सर्व तरुणांवर अत्यंत शोकाकुल वातावणात अंत्यसंस्कार करण्यात आले.  तर इरटीका चालक सुहास शिवकरी ( रा. नवलाख उंबरे, ता. मावळ ) हा गंभीर जखमी झाला असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे. 

शवविच्छेदनासाठी पैसे मागणा-यावर कारवाई करा : खालुंब्रे ( ता. खेड ) येथे एकाच वेळी व एकाच दिवशी अपघातात ठार झालेल्या मृतांच्या नातेवाईकांकडे शवविच्छेदनासाठी येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रत्येकी दोन हजार रुपयांची मागणी केली असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. याबाबत रुग्णालय व्यवस्थापनाने संबंधितांची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करावी.

– राजनभाई परदेशी,. उद्योजक, चाकण.