20 रुपयांची हिरव्या-पिवळ्या रंगाची नवी नोट लवकरच चलनामध्ये

217

रिझर्व्ह बँके (RBI) ने लवकरच 20 रुपयांची नवीन नोट चलनामध्ये आणण्याचा निर्णय घेतला आहे. महात्मा गांधी सिरींज अंतर्गत चलनात येणार्‍या या नोटेवर गव्हर्नर शक्तिकांत दास यांचे हस्ताक्षर असतील. नोटेचा रंग हिरवा-पिवळा असा असेल. नोटेच्या मागे देशाची सांस्कृतिक वारसा दर्शवणारी एलोरा गुहा चित्रे असतील. या नोटचा आकार 63mmx129mm असेल.

अशी असेल नवीन नोट

समोरच्या बाजूला…

1. सी थ्रू रजिस्टरमध्ये 20 रुपये लिहिलेलं असेल.

2. देवनागरी लिपीत २० लिहिले आहे.

3. मध्ये महात्मा गांधी यांचे चित्र.

4. मायक्रो लेटर्स मध्ये ‘RBI’, ‘भारत’, ‘INDIA’ आणि ’20’

5. सुरक्षा दोर्‍यावर ‘भारत’ आणि ‘RBI’

6. गारंटी क्लाउज आणि गव्हर्नर शक्तिकांत दास यांचे हस्ताक्षर.

7. उजव्या बाजूला अशोक स्तंभ.

मागली बाजूला….

1. लेफ्ट साइड मध्ये नोट प्रिंटिंग वर्ष

2. स्वच्छ भारत लोगो आणि स्लोगन

3. भाषा पट्टी

4. एलोरा गुहा चित्रे

5. देवनागरी लिपीत २० अंकित

उल्लेखनीय आहे की नोटाबंदीनंतर रिझर्व्ह बँकेने 500 आणि 2000 रुपयांच्या नवीन नोटांसह 200 रुपये, 100 रुपये, 50 रुपये आणि 10 रुपयांच्या नवीन नोटा चलनात आणल्या आहेत. आता लवकरच 20 रुपयांची नवी नोट चलनात येणार आहे.