अभिनेत्री रोहिणी मानेला अटक तर पीएसआय निलंबीत

798

रोल नंबर 18 चित्रपटाचा अभिनेता सुभाष यादव वर केला होता खोटा गुन्हा दाखल

पुणे : अभिनेता सुभाष यादव विरोधात दाखल केलेला विनयभंगाचा बनावट व खोटा गुन्हा मिटविण्यासाठी बोलावून सराईत गुंड व एटीएसच्या पोलीस उपनिरीक्षकाच्या मदतीने त्याला १५ लाखांची खंडणी मागितल्याप्रकऱणी रोल नं १८ चित्रपटातील अभिनेत्री रोहीणी माने हिला पुणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या टीम ने सापळा लावून लातूर मधून अटक केली़. मात्र एटीएस चा पीएसआय अमोल टेकाळे तिथून फरार झाला मात्र रोहिणी माने तिथे सापडली. दरम्यान पोलिस उपनिरीक्षक अमोल टेकाळे यांना खोटी केस करून फिर्यादीला त्रास दिल्याप्रकरणी नोकरीवरुन निलंबित करण्यात आले आहे.

याप्रकरणी सराईत गुन्हेगार राम भरत जगदाळे याला पोलिसांनी अटक केली होती.त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. तर रोहिणी मच्छिंद्र माने (रा़ नळदुर्ग, ता़ तुळजापूर, जि़ उस्मानाबाद), अभिनेत्री सारा श्रवण ऊर्फ सारा गणेश सोनवणे (रा़ मुंबई, सध्या दुबई) आणि अमोल टेकाळे (लातूर) यांच्याविरुद्ध अनेक गंभीर कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता़. हा प्रकार राम जगदाळे याच्या सहकारनगर येथील कार्यालयात घडला होता़.याप्रकरणी सुभाष दत्तात्रय यादव (रा. गुलमोहर सोसायटी,शास्त्री रोड, पुणे) यांनी फिर्याद दिली होती़.

रोल नंबर १८ या चित्रपटामधे सुभाष यादव व रोहिणी माने यांनी अभिनेता व अभिनेत्री म्हणून काम केले होते़. सुभाषने याआधी अनेक चित्रपटामधे काम केले असून लवकरच त्याचे आणखी दोन चित्रपट प्रदर्शित होत आहेत. कॉमेडी तड़का या शो मुळे तो प्रसिद्धिच्या झोतात आला होता. सुभाषला त्याच्या अभिनय कौशल्यामुळे सर्वत्र मिळत असलेला प्रतिसाद व त्याला लाभलेला चाहतावर्ग व त्याची प्रगती या गोष्टी सहन न झाल्यामुळे रोहिणी माने हिने सुभाष यादव बद्दल रोल नंबर 18 हा चित्रपट प्रदर्शित झाल्या नंतर एक बदनामीकारक व्हिडिओ व्हायरल केला होता ज्यात पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनामुळे सुभाष आनंदाने नाचत आहे असा दिशाभूल करणारा संदेश त्यात होता. त्याची तक्रार सुभाषने वानवडी पोलिस स्टेशन ला केल्यानंतर तपासाच्या नावाखाली सुभाष ला दुसऱ्या दिवशी बोलावून घेवून त्याच्या विरोधात पोलिस उपनिरक्षक अमोल टेकाळे याची मदत घेवून रोहिणी माने हीने दबावतंत्र वापरून व संगनमत करून वानवडी पोलिस स्टेशन च्या वॉशरूम मधे सुभाषने तिचा विनयभंग केला, छेड़ काढली अशी बनावट व खोटी तक्रार दिली होती.

त्यानंतर हे प्रकरण मिटविण्यासाठी सुभाष यादवला सहकुटुंब त्यांनी सराइत गुंड राम जगदाळे याच्या कार्यालयात बोलावून घेतले व सलग 3 तास जीवे मारण्याच्या, तसेच आणखी खोटे गुन्हे दाखल करू अशा धमक्या देवून व पिस्तुलाचा धाक दाखवून जबरदस्तीने रोहिणीचे पाय धरायला लावून त्याचा व्हिडिओ चित्रीत केला व त्या व्हिडिओ मधे सुभाषच्या मनाविरुद्ध प्रत्येक गोष्ट जबरदस्तीने कबूल करायला लावली.ज्या गोष्टी सुभाष ने केल्या नाहीत त्या गोष्टीसाठी देखील पिस्तुलाचा धाक दाखवून सुभाष कडून जबरदस्तीने होकार घेतले गेले. त्यानंतर त्यांनी प्रकरण मिटवण्या साठी व चित्रित केलेला व्हिडिओ व्हायरल न करण्यासाठी १५ लाख रुपयांची खंडणी मागितली़ व त्यांच्या भावाकडून १ लाख रुपये घेतले़. उर्वरित पैसे न दिल्यामुळे त्यांनी रोहिणी माने हिची दुबईतील मैत्रीण अभिनेत्री सारा श्रवण हिच्या मार्फत तो व्हिडीओ सोशियल मीडिया मधे व्हायरल केला तसेच सारा श्रवण हीने सुभाष चे करीयर संपवन्यासाठी चित्रपट महामंडळाचे नाव वापरून अनेक बदनामीकारक पोस्ट व खोट्या अफवा व्हायरल केल्या.

त्यानंतर सुभाष यादवने दिलेल्या फिर्यादीवरून तपास करून या सर्व गोष्टीत धक्कादायक तथ्य आढळून आल्या मुळे सर्वप्रथम गुंड राम जगदाळे याला अटक केली. त्यानंतर आता रोहीणी माने हिला अटक करण्यात आली आहे. तर एटीएसचा पीएसआय अमोल टेकाळे हा अजूनही फरार असून त्याला नोकरीतून निलंबित करण्यात आले आहे. तसेच सध्या दुबई मधे असणाऱ्या सारा श्रवण ला देखील लवकरात लवकर अटक करण्याची प्रक्रीया सुरु आहे.

पुणे पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम , सहाय्यक आयुक्त भानुप्रताप बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा यूनिट 2 चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन पवार हे पुढील तपास करत आहेत.