भारतातील रिअल इस्टेट क्षेत्रात सध्या 294 दशलक्ष चौरस फूट REITable ऑफिस स्पेस मालमत्ता उपलब्ध

158

REITableऑफिस स्पेस मालमत्तेचे संभाव्य मूल्य 35 अब्ज डॉलर

भारतीयऑफिस स्पेसमधील गुंतवणुकीमध्ये प्रचंड स्वारस्य, प्रगतीशील नियमन व उत्तम ऑफिस स्पेसक्षेत्रे REITच्या वाढीसाठी पोषक

आयटी/आयटी-एसईझेडऑफिस स्पेसचे देशभरातीलREITable मालमत्तांमध्ये प्रभुत्व

REITableऑफिस स्पेसशेअरच्या बाबतीत बेंगळुरू आघाडीवर, त्यानंतर मुंबई, दिल्ली-एनसीआर व चेन्नई यांचा क्रमांक

रिटेल, वेअरहाउसिंग व हॉस्पिटॅलिटी अशा अन्य संपत्ती वर्गांमध्ये भविष्यात REIT गुंतवणुकींसाठी वाव


भारतातील व्यावसायिक रिअल इस्टेट क्षेत्रातील सध्याच्या ऑफिस जागेपैकी REITABLE294 दशलक्ष चौरस फूट जागा उपलब्ध होईल, असा अंदाज आहे. इंडिया आरईआयी –रिअल इस्टेटमधील गुंतवणुकीचा नवा अध्याय असे शीर्षक असणाऱ्या जेएलएलच्या नव्या अहावालानुसार,या REITableमालमत्तांचे मूल्य 35 अब्ज डॉलर असेल.

वाढती पारदर्शकता, प्रगतीशील नियमन व देशातील उत्तम व्यावसायिक रिअल इस्टेट क्षेत्र, यामुळे हे क्षेत्र संस्थात्मक गुंतवणूकदारांमध्ये लोकप्रिय झाले आहे. गुंतवणूकदारांनी प्रत्यक्ष गुंतवणुकीच्या माध्यमातून व एंटिटी स्तरीय गुंतवणुकीद्वारे 2006 ते 2019 कालावधीत, ऑफिस स्पेसमध्ये अंदाजे 17 अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे.

भारतात या वर्षी मार्चमध्ये, एम्बसी ग्रुप-ब्लॅकस्टोन संयुक्त भागीदारीने पहिलेREITलिस्टिंग केले आहे. 32.6 दशलक्ष चौरस फूट इतके असणारे हे लिस्टिंग क्षेत्राच्या बाबतीत आशियातील सर्वात मोठे आहे.

जेएलएल इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी व कंट्री हेड रमेश नायर यांनी सांगितले, “भारतातील पहिल्या REIT लिस्टिंगमधून रिअल इस्टेट मालमत्तांच्या संस्थाकरणाला प्रारंभ झाला आहे, तसेच रिअल इस्टेट क्षेत्रातील प्रगल्भता व प्रोफेशनलीझम वाढला असल्याचेही यातून दिसून येते. REIT बद्दल माहिती जसजशी वाढेल तसतशी स्वीकारार्हता वाढेल व रिटेल गुंतवणूकदारांचे स्वारस्यही वाढेल.आम्ही रिटेल, वेअरहाउसिंग व हॉस्पिटॅलिटी अशा अन्य संपत्ती वर्गांमध्येही प्रवेश करायचा आहे आणि आगामी काळात REITableमालमत्ता उपलब्ध करायच्या आहेत.”

REITableक्षेत्रातील33% हिस्सा असणाऱ्या बेंगळुरूमध्ये सर्वाधिक REITableमालमत्ता उपलब्ध असून त्यांचे एकूण क्षेत्र 97.8 दशलक्ष चौरस फूट आहे व मूल्य 10.7 अब्ज डॉलर आहे, असे अहवालात नमूद केले आहे. त्यानंतर मुंबईचा क्रमांक असून, एकूणREITableक्षेत्रामध्ये 17% हिस्सा आहे, एकूण क्षेत्र 49.7 दशलक्ष चौरस फूट आहे व मूल्य 8.6 अब्ज डॉलर इतके आहे. क्षेत्र व मूल्य या दोन्ही बाबतीत मुंबईनंतर दिल्ली-एनसीआर व चेन्नई यांचे स्थान आहे. मोठे व दर्जेदार आयटी क्षेत्र जागतिक कंपन्यांनी व्यापले असून, REITableमालमत्तांसाठी बेंगळुरू हे सर्वात लोकप्रिय शहर आहे. सिंगल-ओनरशिप-रेडी मालमत्तांमुळे मालमत्ता हाताळणे वREITableसाठी व्यवस्थापित करणे सोपे होते.

नवेऑफिस स्पेसऑक्युपायर्स, आयटी/आयटीईएस कडून वाढती मागणी, जागतिक इन-हाउस सेंटर्स व बीएफएसआय स्पेस यामुळे येत्या तीन वर्षांत ऑफिस स्पेससाठी मागणी मोठी राहील, अशी अपेक्षा आहे.

जेएलएल इंडियाचे चीफ इकॉनॉमिस्ट व रिसर्च अँड आरईआयएस प्रमुख सामंतक दास यांनी सांगितले, “भारतातीलऑफिस स्पेसमध्ये,2019-21 या कालावधीत पूर्ण होण्याची अपेक्षा असणाऱ्यानव्या कार्यालयांतून REIT साठी अतिरिक्त 101 दशलक्ष चौरस फूट उपलब्ध करण्याची क्षमता आहे. यामुळे आगामी REIT ना अधिक भाडे मिळणे व मालमत्तेचे मूल्य वाढणेही शक्य होईल. तसेच, रिअल इस्टेटमध्ये संस्थात्मक पैशांचा ओघ सक्षम झाल्याने देशात REITच्या वाढीसाठी चालनाही मिळेल.विमा व पेन्शन फंडांच्या सक्रिय सहभागामुळे भविष्यात दीर्घकालीन वाढीसाठी मदत होईल.”

अधिक माहितीसाठी डाउनलोड करा – India REITs – Heralding a new era in real estate investments.