देश चालवायला ५६ इंचाची छाती नाही, तर चांगलं हृदय लागतं : रितेश देशमुख

मुंबई :  लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरात आरोप आणि प्रत्यारोप होत आहेत. अशातच बॉलिवूड मधील अभिनेता रितेश देशमुख याचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झालेला आहे. या व्हिडीओ मध्ये रितेश देशमुख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना दिसत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका भाषणातील ५६ इंचाची छाती असल्याच्या वाक्यावर, रितेश देशमुख या व्हिडीओ मध्ये बोलताना ५६ इंचाच तर गोदरेजचं कपाट असतं, देश चालवायला ५६ इंचाची छाती नाही तर चांगलं हृदय लागतं, असे बोलताना दिसत आहे.

Pune Prahar

पुणे प्रहार

error: Content is protected !!