मोदींमुळे देश हुकूमशाहीच्या दिशेने ; डॉ. कुमार सप्तर्षी यांची टीका

नगर: पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच भारतीय लोकशाहीसमोरील मोठे आव्हान आहेत. त्यांच्यामुळे देश हुकूमशाहीच्या दिशेने चालला आहे. ते जर पुन्हा पंतप्रधान झाले, तर देश हिटलरशाहीकडे झुकेल, असा दावा युवक क्रांती दलाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी यांनी केला.

मतदार जागृती परिषदेच्या वतीने नगर येथील माऊली सभागृहात लोकसभा निवडणुका व देशासमोर आव्हाने, या विषयावर डॉ. सप्तर्षी बोलत होते. या कार्यक्रमात जिल्ह्याच्या सामाजिक व राजकीय विषयांवरही चर्चा झाली. नांदेड विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे, युवक क्रांती दलाचे जिल्हाध्यक्ष सुदाम लगड, अप्पा अनारसे यावेळी उपस्थित होते.

दरम्यान, मोदीयुक्त भाजपला 2019च्या निवडणुकीत मतदान करू नये. भाजप विरोधातील अन्य कोणत्याही पक्षाला मतदान केले जावे. मोदी सरकार सत्तेवरून पायउतार होण्यासाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मतदान करण्याबाबतही यावेळी डॉ. कुमार सप्तर्षी यांनी सूचवले.

Pune Prahar

पुणे प्रहार

error: Content is protected !!