चाकण येथे रामनवमी उत्साहात साजरी

25

चाकण : भजन, कीर्तन, प्रवचन व महाप्रसादाचे वाटप करत चाकण व परिसरात श्रीराम नवमी उत्साहात साजरी करण्यात आली. येथील जय श्रीराम नगर मित्र मंडळ व श्रीराम फेडरेशन मित्र मंडळ यांच्या सयुंक्त विद्यमाने श्रीराम नवमी उत्साहा निमित्त आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात हजारो भाविकांनी श्रवण सुखाबरोबर महाप्रसादाचा लाभ घेतला.

येथील जय श्रीराम नगर मध्ये सकाळ पासुनच विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल सुरु होती. पहाटे देवाची पूजा, देवाचा अभिषेक करून श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.

दिरावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करून सभामंडपात ह.भ.प. राम शेवाळे यांची कीर्तन रुपी सेवा पार पडली. भजन, प्रवचन, देवाची पालखी मिरवणूक आदि धार्मिक कार्यक्रमांनी अवघा चाकण परिसर भक्ती रसात चिंब झाला होता. यावेळी उपस्थित भाविकांनी श्रवण सुखाबरोबर महाप्रसादाचा लाभ घेतला.