माधव सुर्यवंशी आष्टीचे नवीन पोलीस निरीक्षक

36

आष्टी। संतोष तागडे : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा अंतर्गत अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या  आहेत. आष्टी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शौकत अली सय्यद यांची बीड येथील पेठ बीड पोलीस ठाण्यात बदली झाली असून त्यांच्या जागेवर भूम (जि उस्मानाबाद) येथिल  पोलीस निरीक्षक माधव सूर्यवंशी हे राजू झाले आहेत  गुरुवार दि २८ रोजी रात्री उशिरा पदभार स्वीकारला असून सूर्यवंशी यांनी नवी मुंबई, मुंबई, पुणे, चंद्रपूर, भूम आदी ठिकाणी कडक, शिस्तप्रिय उत्कृष्टपणे कामगिरी बजावली आहे. त्यांनी जेथे जेथे पदभार घेतला.

तेथे तेथे त्यांनी अनेक गुन्हेगार, अवैध धंदे वाल्यांचे मूसक्या आवळले आहे.  आष्टीतालुक्यात गेल्या अनेक दिवसात अवैध धंदे बोकाळले असून रोड रोमिओनी ही अक्षरशः उच्छाद मांडला आहे यांवर कारवाई च्या जनतेतून अपेक्षा व्यक्त   होत आहे.