वाघ परतला…

16

वाघा बॉर्डर : अभिनंदन यांच्या बरोबर भारतीय डिफेन्स अटॅची म्हणजेच संरक्षण मंत्रालयाचे अधिकारी आहेत. सीमेच्या पाकिस्तानी बाजूकडे अटारी बॉर्डरवरून त्यांना घेऊन येतानाचा व्हिडिओ दिसताच जल्लोष करण्यात आला. वाघा बॉर्डरचे दरवाजे उघडले आणि अभिनंदन भारतात परतले.

नौशेरा सेक्टरमध्ये घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानचं जेट F-16 लढाऊ विमानं पाडताना भारताचं मिग-21 हे विमान पाकिस्तानच्या भूमीत पडलं. यावेळी जखमी अवस्थेतील अभिनंदन वर्तमान हे पाकिस्तानच्या तावडीत सापडले होते. मात्र भारत आणि आंतरराष्ट्रीय समुदायाकडून आलेल्या दबावानंतर पाकिस्ताननं अभिनंदन याची सुटका करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आज अभिनंदन यांची सुटका होणार असल्यानं संपूर्ण देशात जल्लोषाचं वातावरण आहे.