भारताने केलेल्या हल्ल्यावर राज ठाकरे म्हणतात…

19

मुंबई : गेल्या 12 दिवसांआधी जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या आत्मघातकी हल्ल्यामध्ये भारताने CRPF चे 42 जवान गमावले. मंगळवारी भारताच्या वायुसेनेनं या हल्ल्याचं चोख प्रत्युत्तर दिलं. आज भारताच्या वायुसेनेनं पाक व्याप्त काश्मीरमध्ये सीमा रेखा ओलांडत जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे कॅम्प उध्वस्त केले. यावर संपूर्ण देशभरातून भारतीय सैन्याचं कौतूक होतं असताना आता यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

भारतीय वायुदलाचं कौतुक करत राज ठाकरे यांनी ट्वीट केलं आहे. ‘भारतीय हवाई दलाने ज्या पद्धतीने अतिरेक्यांचे तळ उध्वस्त केले, त्या बद्दल मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे भारतीय हवाई दलाचं मनापासून अभिनंदन करतो.’ असं लिहित त्यांनी ट्वीट केलं आहे.

दरम्यान, पुलवामा हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिलं पाहिजे असंदेखील ट्वीट राज ठाकरे यांनी आधी केलं होतं. हे ट्वीट करताना राज ठाकरे यांनी शहीदांना श्रद्धांजली देत या हल्ल्याचा बदला घ्या असं त्यांनी म्हटलं होतं.

असा झाला Air Srrike : पहाटे 3 वाजून 30 मिनिटांनी भारतीय वायु दलाच्या मिराज – 2000 या विमानांनी पाक व्याप्त काश्मीरमध्ये प्रवेश करत दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य केलं. यामध्ये 200 पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा केला. भारतीय वायु दलानं केलेल्या कारवाईमुळे दहशतवाद्यांना पळता भूई थोडी झाली. या हल्ल्यामध्ये 5 पाकिस्तानी सैनिक देखील ठार झाले. तर जखमींवर रूग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. 21 मिनिटं भारतीय हवाई दलानं केलेल्या बॉम्ब हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांच्या तळाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं.प्रत्युत्तरादाखल पाकनं भारतीय हवाई दलावर हल्ला केला. पण, भारतीय हवाई दलापुढे त्यांची डाळ शिजली नाही.