अखेर नवले पुलाखालील सिग्नल सुरू

178

कोंडीवर उपाययोजनांची गरज

नºहे : नºहे येथील नवले पुलाखाली असलेल्या सिग्नल यंत्रणेचे उद्घाटन खडकवासला मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात झाले होते. मात्र उदघाटन नंतर तीन – चार दिवसांतच ही सिग्नल यंत्रणा वाहतूक पोलिसांनी बंद ठेवली होती. कारण सिग्नल बसविल्यानंतर तीन – चार दिवसांतच सिग्नल बसविण्याअगोदरपेक्षा जास्त वाहतूककोंडी होत असल्याने नाइलाजास्तव वाहतूक पोलिसांनी सिग्नल यंत्रणा बंद ठेवून वाहतूक पोलीस स्वत: वाहतूककोंडी टाळण्यासाठी गर्दीच्या वेळी सकाळी व संध्याकाळी स्वत: उभे राहून वाहतूक नियोजन करीत आहेत.

यासंदर्भात वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांनी राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाला उपाययोजना सुचवून त्या पूर्तता करण्याबाबतचे पत्रही दिले होते, यामध्ये नवले पुलाखालून नºहे गावाकडे जाणारा पश्चिम बाजूचा सर्व्हिस रस्ता हा सिंगल असून येणाऱ्या व जाणाºया वाहनांसाठी तो रस्ता पुरेसा नव्हता, नवले पुलाखालील पश्चिम बाजूस भिंतीलगत ५ ते ६ फूट बाजूला असून तो रस्त्यापासून खाली होता, या ठिकाणावरून वाहनांना जाता येत नाही त्यासाठी बाजूपट्टी भरून घेणे आवश्यक होते . मात्र ह्यासंदर्भात बातमी प्रसिद्ध होताच तातडीने राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने अपुºया सर्व्हिस रस्त्याचे काम पूर्ण केले. लागलीच वाहतूक पोलिसांनी नाइलाजास्तव बंद ठेवलेला सिग्नल पुन्हा सुरू केला असून, सध्या संध्याकाळी इथे सिग्नल चालू केल्याने थोड्याफार प्रमाणात वाहतूक कोंडी होत असली तरी, अपघाताचे प्रमाण मात्र कमी होईल, तसेच वाहतूककोंडी टाळण्यासाठी आम्ही इतर उपाययोजनाही आखल्या असून त्या टप्प्याटप्प्याने राबविण्यात येणार असल्याचे वाहतूक पोलीस उपनिरीक्षक सुबराव लाड यांनी प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.

सर्व्हिस रस्ता अपुरा असल्याने आम्ही सिग्नल बंद ठेवले होते, परंतु आता रस्ता पूर्ण झाल्याने पुन्हा सिग्नल सुरू केला असून वाहनसंख्या बघून अजूनही आम्ही सिग्नल यंत्रणेच्या सेकंदामध्ये बदल करण्यासाठी प्रयत्नशील आहे.

– राजेंद्र काळे, पोलीस निरीक्षक, वाहतूक विभाग

ठळक मुद्दे :
सिग्नल यंत्रणा चालू झाली असली तरी वाहतूककोंडी कायम
वाहतूककोंडीवर उपाययोजनांची गरज
सिग्नल यंत्रणा चालू झाल्याने अपघाताचे प्रमाण होणार कमी
नागरिकांनीही वाहतूककोंडी टाळण्यासाठी प्रयत्नशील असण्याची गरज