मिरवणुकीतील शिवभक्तांना तुळशीच्या रोपांची भेट !

175

पुणे : काँग्रेसच्या पर्यावरण विभागातर्फे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त पुणे शहरातील मिरवणूकात सहभागी शिवभक्तांचे स्वागत तुळशीची रोपे भेट देऊन करण्यात आले.

शिवभक्तांचे स्वागतासाठी पुणे शहर जिल्हा व पुणे जिल्हा  काँग्रेस कमिटी, पर्यावरण विभागातर्फे स्वागत कक्ष उभारण्यात आला होता.या वेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ,पर्यावरण विभागाचे अध्यक्ष अशोकराव मोरे यांच्या हस्ते आलेल्या शिवप्रेमींना तुळशी च्या रोपांचे  वाटप करून पर्यावरण रक्षणासाठीचा संदेश देण्यात आला.

या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी पर्यावरण विभागाचे अध्यक्ष अशोकराव मोरे, सरचिटणीस पराग आठवले, तेजिंदरसिंग अहलुवालिया,पुणे जिल्हा   काँग्रेस कमिटी अध्यक्ष संजय जगताप,वरिष्ठ उपाध्यक्ष संग्राम मोहोळ,सरचिटणीस पृथ्वीराज पाटील,पुणे शहर जिल्हा अध्यक्ष पर्यावरण विभाग  प्रमोद  पंडीत, सचिव राहुल  सुपेकर,रोहित पंडित तसेच पुणे जिल्हा पर्यावरण विभाग अध्यक्ष गिरीश खाटपे व कार्यकर्ते उपस्थित होते.