माध्यम शास्त्राचे ज्ञान  ही काळाची गरज : नितीन केळकर 

27

पुणे (शिल्पा देशपांडे) : माध्यम शास्त्राचे ज्ञान आवश्यक आहे. भाषेची आणि अभिव्यक्तीची जी कौशल्ये आपण शाळेपासून शिकवतो त्या भाषेचा संवादासाठी कसा वापर करावा हे ज्या माध्यमातून करायचा आहे ते आताचे माध्यम सोशल मीडिया आहे. तिथे याचा कसा वापर करावा हे शिकवले गेले तरच याचा योग्य उपयोग होईल. असे पुणे आकाशवाणी केंद्राचे उपसंचालक नितीन केळकर म्हणाले. एस. एस. प्रॉफेशनल्स कॅम्पस आणि नॅशनल युनियन ऑफ जर्नलिस्टस्  महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या सोशल मीडिया वरील कार्यशाळेच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.

सोशल मीडियासाठी दृक् श्राव्य माध्यमातून प्रकट होताना वैचारिक कल्पना विस्तार कसा असावा याविषयी माहिती देणारी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. प्रशिक्षक अभिजीत  टिळक यांनी प्रशिक्षणार्थीना दृक् श्राव्य कसे असावे याविषयी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेची संकल्पना व नियोजन एनयुजेमहाराष्ट्रच्या प्रवक्त्या शिल्पा देशपांडे यांचे होते.

एस.एस. प्रॉफेशनल्सचे संचालक डॉ. शिशिर पुराणिक यांनी भविष्यात अशा अजून कार्यशाळा आयोजित करणार आहोत ज्याद्वारे सोशल मीडियाचा योग्य वापर होईल, असे सांगितले. या कार्यशाळेसाठी सुमारे ३० प्रशिक्षणार्थीनि आपला सहभाग  नोंदविला यामध्ये पत्रकार, उद्योजक, विद्यार्थी तसेच कलाकार यांचा समावेश होता. नॅशनल युनियन ऑफ जर्नलिस्ट्स महाराष्ट्र च्या अध्यक्षा शीतल करंदेकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषांत सोशल मीडियाचा वापर योग्य प्रकाराने झाल्यास पत्रकारिताही चांगल्या दिशेने जाईल असे सांगितले.

दुसऱ्या सत्रामध्ये आजची शिक्षणपद्धती या विषयावर परिसंवाद घेण्यात आला. यामध्ये  डॉ. शिशिर पुराणिक, अर्चना मवाळ, शीतल करंदेकर यांनी सहभाग घेतला. तर पत्रकारितेतील आव्हाने या विषयावरील परिसंवादात सचिन चपळगावकर, रायचंद शिंदे, जितेंद्र जाधव, श्रीकांत काकतिकर. यांनी विचारमंथन केले. या कार्याक्रमामध्ये श्रीकांत काकतीकर यांचा बेळगाव जिल्ह्यातील  युनियनच्या कार्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार दीपक मोहिते यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

या कार्यशाळा उपक्रमासाठी दीपक चव्हाण, युनियन च्या खजिनदार वैशाली आहेर, सुषमा पाटील  यांनी विशेष योगदान दिले. या कार्यक्रमासाठी विजया मानमोडे, तुषार शेंडे, आदी पुणे जिल्ह्यातील पत्रकार उपस्थित होते.