आता महाराष्ट्र पेटवणार : जितेंद्र आव्हाड

137

शिवद्रोही बाबासाहेब पुरंदरेंना पद्मविभुषणे मिळणे ही इतिहासासाठीच लाजिरवाणी गोष्ट आहे. शिवाजी महाराजांची बदनामी करणाऱ्यांनाच हे सरकार पोसत असून त्याविरोधात महाराष्ट्र पेटवू. लोकांना जागरूक करण्यासाठी पुन्हा एकदा शिवसन्मान परिषदा घेणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. जिजाऊंची, छत्रपतींची बदनामी करणाऱयांना सरकार मोठं करतंय. जेम्स लीनला खोटी माहिती देणारे पुरंदरेच होते. सोलापुरात त्यांनी पुस्तकाचं कौतुकही केले होते. अशा शिवद्रोही लोकांना सातत्याने गौरवणाऱ्या सरकारविरोधात सर्वसामान्यांच्या मनात शंका निर्माण होत आहे. याविरोधात महाराष्ट्रभरात वैचारिक आग लावू, अशी धमकीच आव्हाडांनी व्हिडिओत दिली आहे.