कुंभ मेळा : तृतीयपंथीयांच्या आखाड्याने पवित्र कुंभस्नानासाठी लावली हजेरी

55

उत्तरप्रदेश :उत्तरप्रदेश मधील प्रयागराज येथील कुंभमेळा यंदाच्या वर्षी ऐतिहासिक ठरला आहे. कुंभस्नानासाठी जगभरातील लाखो भक्त आणि साधू याठिकाणी येतात. मात्र यावेळी कुंभमेळ्यामध्ये तृतियपंथीयांची उपस्थिती विशेष ठरली आहे. यावेळी तृतीयपंथीयांनी गंगानदीत पवित्र स्नान केली असून, या आखाड्याने कुंभ मेळ्यातील सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

अभिनेत्री लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनी तृतियपंथीयांचे नेतृत्व केले, त्यावेळी २० लाखहून अधिक तृतीयपंथीयांनी त्यांना पाठिंबा दिला. लक्ष्मी त्रिपाठी यांची अस्तित्व नावाची स्वयंसेवी संस्था आहे. त्यांचा मुख्य उद्देश पर्यावरण रक्षण, गोरक्षा, स्त्री-भ्रूण हत्या विरोध, बालविवाह विरोध यांसाठी काम करत आहे.

प्रयागराज येथे सुरु असलेल्या यंदाच्या कुंभमेळ्यात अशाप्रकारे तृतीयपंथीयांची उपस्थिती हा अतिशय चर्चेचा विषय ठरला असून कुंभमेळ्यातील तृतीयपंथीयांची उपस्थिती ऐतिहासिक ठरली.