बालपणीच्या मैत्रिणीबरोबर लग्नाच्या बेडीत अडकणार हार्दिक पटेल

216

अहमदाबाद – पाटीदारांना आरक्षण मिळण्यासाठी आक्रमक आंदोलनाचे नेतृत्व करणाराचा गुजरातचा तरुण पाटीदार नेता हार्दिक पटेल 27 जानेवारीला लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. तो बालमैत्रीणि किंजल पारीखबरोबर लग्न करणार आहे. गुजरातच्या सुरेंद्रनगर जिल्ह्याच्या दिगसार गावात हे लग्न होणार आहे. दोन वर्षांपूर्वी हार्दिक देशद्रोहाच्या खटल्यात तुरुंगात असताना तया दोघांच्या साखरपुड्याची घोषणा झाली होती. किंजलने कॉमर्समध्ये ग्रॅज्युएशन केले असून ती सध्या लॉचे शिक्षण घेत आहे.

हार्दिक अत्यंत साध्या पद्धतीने लग्न करणार असल्याची माहिती मिळाली आहे. दोन्ही कुटुंबातील अत्यंत जवळच्या अशा फक्त 100 पाहुण्यांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा होणार आहे. हार्दिक पटेलची कुलदेवता मेलडी माता मंदिरामध्ये हे लग्न होणार असल्याची माहितीही मिळाली आहे.

हार्दिकच्या बहिणीबरोबर शिकायची किंजल 

हार्दिक आणि किंजल दोघे एकमेकांना अगदी लहानपणापासून ओळखतात. किंजल अगदी सुरुवातीपासून हार्दिकच्या घरी येत राहिलेली आहे. हार्दिक पटेलची बहीण मोनिकाबरोबर किंजल शिकत होती. तिचे कुटुंब मूळचे सूरतचे आहे. पण ते अनेक वर्षांपूर्वी हार्दिकच्या गावात स्थलांतरीत झाले होते.