कर्नाटकात देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांची बोट काळी नदीत उलटली

169

16 जणांना जलसमाधी, 6 मृतदेह सापडले

कारवार (कर्नाटक) : देवदेर्शनासाठी गेलेल्या भाविकांची बोट नदीत उलटून झालेल्या भीषण दुर्घटनेत 16 जणांचा जलसमाधी मिळाली. कारवारजवळील काळी नदीत सोमवारी (ता.21) ही घटना घडली. नौदल, मच्छीमार आणि तटरक्षक जवानांनी आतापर्यंत 6 मृतदेह बाहेर काढले आहेत. इतर भाविक अद्याप बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.

मिळालेली माहिती अशी की, बोटमध्ये बसून भाविक नदीमधील एका बेटावरील मंदिरात देवदर्शनासाठी जात होते. तेव्हा ही घटना घडली. बेपत्ता नागरिकांचा शोध घेण्यासाठी गोव्याहून चेतक हेलिकॉप्टर पाचारण करण्‍यात आले आहे. स्‍थानिक आमदार रुपाली नायक या देखील देवदर्शनासाठी जात होत्या. मात्र त्या दुसर्‍या बोटमध्ये होत्या.