सक्षम कुलकर्णीचा ‘पप्या राणे’ झाला हिट!

120

पुणे : आपल्या सर्वांना परिचित असलेला लाडका अभिनेता सक्षम कुलकर्णी आता एका नव्या भूमिकेमुळे सध्या चर्चेत आहे. सक्षमने आजवर आपल्या अभिनयाच्या जोरावर सर्वांनाच आपलेसे केले आहे. ‘दे धक्का’, ‘पक पक पकाक’, ‘शिक्षणाच्या आयचा घो’ इ. चित्रपटांतून त्याने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. सध्या कॅफेमराठीच्या ‘एव्हरी मराठी हाऊस पार्टी एवर’ मध्ये त्याने साकारलेला पप्या राणे मराठी प्रेक्षकांमध्ये चांगलाच लोकप्रिय होत आहे.

नुकत्याच त्याने कॅफेमराठीच्या “पॅडेड की पुशप” या वेब सिरीज मध्ये देखील सक्षम कुलकर्णी अफलातून भूमिकेत होता. सक्षमने कॅफेमराठी सोबत अशा प्रकारचा कॉमेडी व्हिडीओ पहिल्यांदाच केला आहे. त्याने साकारलेला पप्या पहिल्याच व्हिडीओ मध्ये प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. मराठी मुलांच्या घरातील पार्टी कशी असते हे विनोदी अंगाने दाखवण्यात आले आहे. त्याची बोलण्याची शैली, हावभाव सर्वच काही एकदम भन्नाट झालं आहे. सक्षमचे आई वडिल भल्या पहाटे दोन दिवसांसाठी गावी जातात. दोन दिवस आई-वडिल घरात नसल्याने सक्षम लगेचच आपल्या मित्र आणि मैत्रिणींना फोन करून  सांगतो की माझे आईवडील दोन दिवसांसाठी बाहेर गले आहेत. तर आज रात्री माझ्या घरी पार्टीला या म्हणून सगळ्यांना बोलावतो. शिवाय आपल्या मित्रांना गरजेच्या वेळी ऑनलाईन पद्धतीने चांगली हॉटेल्स कशी शोधावी हे त्रिवागो या मोबाईल अॅपच्या माध्यमातून तेही विनोदी अंगाने दाखवण्यात आले आहे. सगळे मित्र मैत्रिणी सक्षमच्या म्हणजे पप्याच्या घरात काय काय गोंधळ घालतात याचीच गंमत या व्हिडीओमध्ये बघायला मिळेल. हा व्हिडीओ कॅफेमराठीच्या युट्युबवर आपण मोफत पाहू शकतात.या व्हिडीओचे दिग्दर्शन संदीप मनोहर नवरे यांनी केले आहे.

[embedyt] https://www.youtube.com/watch?v=asZDURpXrqA[/embedyt]