आयडीएफसी बँक आणि कॅपिटल फर्स्ट 18 डिसेंबर 2018 पासून विलिनीकृत

332

विलीनीकरणानंतर आयडीएफसी फर्स्ट बँक असे नामांतर, समभागधारकांच्या संमतीअधीन

मुंबई : आयडीएफसी बँक लि. आणि कॅपिटल फर्स्ट लि. चे आज सर्व आवश्यक समभागधारक व नियामक संमत्या प्राप्त केल्यानंतर विलीनीकरण पूर्ण झाल्याची घोषणा केली, आता हा विषय केवळ समभागधारकांच्या संमतीअधीन आहे.

विलीनीकरणानंतर आयडीएफसी बँकेच्या संचालक मंडळाने कॅपिटल फर्स्ट लिमिटेडचे संस्थापक आणि अध्यक्ष श्री. व्ही वैद्यनाथन यांची विलिनीकृत कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व चीफ एक्झिक्युटीव्ह ऑफिसर म्हणून निवड केली, जी समभागधारकांच्या संमतीअधीन आहे.

आयडीएफसी फर्स्ट बँकेच्या माध्यमातून आता विविध रिटेल आणि होलसेल बँकिंग उत्पादने, सेवा आणि डिजीटल कल्पकता मोठ्या प्रमाणावरील ग्राहकांसाठी देऊ करण्यात येणार आहेत. 203 बँक शाखा, 129 एटीएम, व 454 रुरल बिझनेस कॉरेसपोंडेंट सेंटर्सद्वारे 7.2 दशलक्ष ग्राहकांना देशातील शहरी आणि ग्रामीण भागांत सेवा उपलब्ध होईल.

आयडीएफसी बँक आणि कॅपिटल फर्स्ट लिमिटेडच्या मंडळाने नॅशनल कंपनी ट्रिब्युनलकडून मिळालेल्या सर्व आवश्यक संमत्या आणि ऑर्डरची पडताळणी करण्यासाठी बैठकीचे आयोजन केले होते, ज्यामध्ये निर्धारित तारखेपासून विलिनीकरणाच्या योजनेवर संमती दर्शविण्यात आली. आयडीएफसी फर्स्ट बँकेचे अर्धवेळ गैर-कार्यकारी अध्यक्ष म्हणून आयडीएफसी बँकेचे संस्थापक एमडी आणि सीईओ डॉ. राजीव लाल यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब करण्यात आला. ही निवड आरबीआयच्या संमतीअधीन आहे. आता विलिनीकृत कंपनीचे मंडळ पाच नवनिर्वाचित संचालकांच्या मार्गदर्शनाखाली पंख पसरणार आहे.

सुरुवातीला बोलताना आयडीएफसी फर्स्टचे एमडी आणि सीईओ श्री. व्ही. वैद्यनाथन म्हणाले की, “हे विलिनीकरण आमच्या बँकिंग क्षमता बळकट करण्याकरिता अद्वितीय संधी सादर करणार आहे, ही एक मोठी वैश्विक बँक म्हणून कार्यरत राहील आणि आमच्या ग्राहकांना मोठा लाभ मिळवून देणारी ठरेल.

“आमचा विश्वास आहे की संम्मिलित झालेल्या कंपनीचा पूरक पोर्टफोलियो ग्राहक फळीला मोठी वाढ मिळवून देईल. यामुळे आम्हाला ग्राहकांसाठी विस्तृत पर्याय उपलब्ध करून कर्ज-साह्य मंच विस्तारता येईल, लायबिलिटी फ्रेंचायजी झपाट्याने उभारता येईल. तंत्रज्ञान-आधारित दर्जेदार बँकिंग सेवा पुरवत जनतेसाठी बँकिंग अनुभव समृद्ध करण्याच्या दृष्टीने आमची तयारी सुरू आहे.”

30 सप्टेंबर 2018 रोजी संपलेल्या नोंदवलेल्या तिमाहीच्या आर्थिक निकालांनुसार  संयुक्तपणे आयडीएफसी फर्स्ट बँकचे लोन बुक असेट रु. 1,02,683 कोटींचे आहे. आता एकंदर लोन बुकच्या तुलनेत रिटेल लोन बुकचा 32.46% इतका वाटा आहे.

13 जानेवारी 2018 रोजी विलिनीकरणाची घोषणा झाली आणि विलिनीकृत करारानुसार समभागधारकांना कॅपिटल फर्स्ट लिमिटेडच्या 10 समभागांकरिता आयडीएफसी बँकेचे 139 समभाग मिळतील.