सी.आर.आय पंप्सला भारत सरकारकडून चौथ्यांदा प्रतिष्ठित नॅशनल एनर्जी कन्जर्वेशन पुरस्कार 2018

194

नवी दिल्ली : पंप्स श्रेणीतील नॅशनल एनर्जी कन्जर्वेशन पुरस्कार चौथ्यांदा प्राप्त करून ऊर्जा  बचत करणाऱ्या पंप्सच्या निर्मितीतील आपण एक अग्रणी कंपनी असल्याचे सी. आर. आय पंप्सने पुन्हा एकदा जगासमोर सिद्ध केले आहे.

हा पुरस्कार स्वीकारताना सी. आर. आय. पंप्सचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक श्री. जी. सेल्वाराज म्हणाले, “उत्कृष्टता हे आमचे लक्ष्य आहे आणि ऊर्जा  बचत करण्याच्या आमच्या उद्दिष्टाचे फलित म्हणजे पुरस्कार आहेत.  हा पुरस्कार चौथ्यांदा प्राप्त करणे ही आमच्यासाठी गौरवास्पद बाब आहे.  नाविन्यपूर्ण रचना आणि तंत्रज्ञान याचा योग्य वापर करून ऊर्जा  बचत करणाऱ्या पंप्सच्या निर्मितीसाठी सी. आर. आयने इतकी वर्षे कठोर परिश्रम घेतले आहेत.  ग्राहक, पर्यावरण, समाज आणि एकंदरच संपूर्ण जगासाठी हे अत्यंत फायदेशीर आहे.  तुटपुंज्या अशा नैसर्गिक स्रोत असणाऱ्या उर्जेची बचत करणे हे आमचे उद्दिष्ट असून त्यासाठी सी. आर. आय. अथक प्रयत्नशील रहाणार आहे.  हे उद्दिष्ट साध्य करताना आमच्या सर्व ग्राहकांनी, वितरकांनी, भागीदारांनी, समर्पित भावनेने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी आमच्यावर जो विश्वास दर्शविला आणि आम्हाला पाठींबा दिला त्यासाठी मी त्यांचे आभार मानतो.”

विविध कारणांसाठी बीईई 5 तारांकित प्रमाणित पंप्सची विस्तृत श्रेणी देऊ करत असल्याचा सी. आर. आय. ला अभिमान आहे.  सी. आर. आयच्या ऊर्जा  बचत करणाऱ्या विविध उत्पादनांना अनेक सरकारी संस्थांनी जगभरातील विविध प्रकल्पांमध्ये ऊर्जा बचत करणारी विश्वासू उत्पादने म्हणून मान्यता देऊ केली आहे. सी. आर. आय ही ईईएसएल (एनर्जी एफिशियंट सर्विसेस लिमिटेड) प्रकल्पांमधील जुन्या अकार्यक्षम पंपांना बदलून एलओटीच्या माध्यमातून 5 तारांकित प्रमाणित स्मार्ट पंप्स बसविणारी देशातील सर्वात मोठी योगदानकर्ता आहे.

आत्तापर्यंत सी. आर. आय. ने देशभरात 10 लाख तारांकित प्रमाणित पंप्सची स्थापना केली असून त्यांचा परिणाम म्हणून देशात 9,000 दशलक्ष युनिट्स ऊर्जा एकत्रित केली गेली आहे.