खुशबू कर्वा भारताला मिसेस युनिव्हर्स २०१८ मध्ये चौथ्या क्रमांकावर नेणारी पहीली महिला

181

पुणे: भारताच्या खुशबू कर्वा हीने मिसेस युनिव्हर्स स्पर्धेत भारताला चौथे स्थान पटकावून दिले.  ही स्पर्धा गेल्या आठवड्यात फिलिपाईन्स येथे झाल्या.

खुशबू स्वतःला खुर भाग्यवान समाजते जरी तिने प्रथम क्रमांक पटकावला नसला तरी त्या या स्पर्धेत बर्याच मोठया व कर्तुत्ववान महीलांन बरोबर या मोठ्या व्यासपीठावर उभे राहण्याची संधी मिळाली होती.

खुशबू कर्वा म्हणाला की मला अभिमान वाटतो की मी माझ्या माध्यमातून या व्यासपीठावर सम्पूर्ण भारताला सादर करत होते. या ठिकाणी मला अनेक गोष्टी पाहायला व शिकायला मिळाल्या. भारतातील अन्य महीलांना प्रेरीत करत त्या म्हणाल्या तुम्ही जींका किंवा नका जिंकू तरी प्रत्येकाने अश्या स्पर्धेत सहभागी झाले पाहिजे. प्रत्येक व्यक्ति आपल्या आयुष्याचा शिल्पकार अाहे; व आपण ठरवले तर स्वतःत व सोबत इतरांन मध्ये देखील उत्तम बदल घडवून आणू शकतो.  मला अभिमान वाटतो की मी या व्यासपीठावर खूप काही शिकले आणि आता या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक स्त्रीयांचे तसेच मुलांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

या स्पर्धेत परीक्षकांनी खुशबूच्या फिटनेस आणि कामाबद्दल कौतुक केले ती खूप गोष्टी एकटी आणि यशस्वी पार पाडते.  खुशबू ह्या आपल्या कुटुंब व फिटनेस सोबत उत्तम प्रकारे आपला व्यवसाय देखील सांभाळते.

या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून श्री सावा, मी. मारुल, मिसेस मेगी सावा, मिस मारव्हिवा,  आणि मिसेस सबरीना हे उपस्थित होते.