टपाल कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपाला प्रचंड प्रतिसाद

22

चाकण येथे जोरदार घोषणाबाजी

चाकण : अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवक युनियनच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बेमुदत संपाला चाकण पंचक्रोशीतील टपाल कर्मचाऱ्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला असून, चाकण येथे विविध भागातून आलेल्या टपाल कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला.

टीआरसी. एचए.चे फिक्शेशन लागू करण्यात यावे, फरकाचे मूल्यमापन कमलेशचंद्र कमिटीच्या शिफारशी नुसार लागू करावे, किमान १२, २४ व ३६ वर्षे सेवा झालेल्यांना शिफारशी प्रमाणे वार्षिक वाढ देण्यात यावी, ग्राच्युयटी कमिटीच्या शिफारशी प्रमाणे पाच लाख रक्कम देण्यात यावी, जीडीएसला वैद्यकीय सुविधा व मेडिकल रजा देण्यात यावी, बदलीचे आदेश काढण्यात यावेत. स्वेच्छा निवृत्ती त्वरित लागू करावी, रजा किमान तीस दिवसांची देण्यात यावी, शैक्षणिक भत्ता देण्यात यावा, या अन्य मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी टपाल कर्मचाऱ्यांनी हा बेमुदत संप सुरु केला आहे. आपल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी टपाल कर्मचाऱ्यांनी यावेळी ” कामगार एकजुटीचा विजय असो, ” अशा जोरदार घोषणा चाकण येथे देवून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. यावेळी  अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवा सेवक संघटनेचे सचिव एकनाथ मंडलिक, सहसचिव विष्णू मोरमारे, काव्यलेखक विकास राऊत, संघटन सचिव गीतांजली वाघमारे, दिलीप शिळीमकर आदींसह या भागातील टपाल कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.