आष्टी, पाटोदा, शिरुर तालुक्यात टँकरव्दारे होणारा पाणी पुरवठा शुद्धिकरण करुन करावा : आ. भीमराव धोंडे

37

आष्टी | संतोष तागडे : मतदार संघात सध्या दुष्काळी परिस्थीती निर्माण झाली असुन भिषण पाणी टंचाई निर्माण झाली असुन टंचाई निवारणार्थ सुरु करण्यात आलेल्या टँकरव्दारे पाणी पुरवठा करण्यात येणारे पाणी शुध्दीकरण करुन नागरीकांपर्यंत पोहचवावे अशी मागणी आ. भिमराव धोंडे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाव्दारे केली आहे.

आष्टी, पाटोदा, शिरुर तालुक्यात भिषण पाणी टंचाई निर्माण झाली असून आष्टी तालुक्यासाठी 10 टँकर मंजुर करण्यात आले आहेत. टँकरचा पाणी भरण्याचा उदभव सिना व मेहकरी धरण असून सिना धरणामध्ये अहमदनगर जिल्हयातील सांडपाणी मिसळलेले आहे. त्यासाठी सदरच्या धरणातील पाणी पिण्यास योग्य नसल्याने आष्टी तालुक्यातील नागरीकांचा  आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार आहे.त्यामुळे सिना व मेहकरी धरणातील पाणी टँकरमध्ये भरण्यापेक्षा दोन्ही धरणातील बाजूला बुडख्या खोदून बुडख्यातील पाणी टँकर मध्ये भरल्यास लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार नाही. त्याचप्रमाणे पाटोदा व शिरुर तालुक्यातील ज्या तलावामध्ये उदभव आहेत त्या सर्व ठिकाणी बुडख्या खोदून शुध्द पाणी पुरवठा करणेसाठी उपाययोजना करावी असी मागणी आ.धोंडे यांनी केली आहे.