मक्याची कमाल गोधडी धमालचे पोस्टर लॉंच

235

पुणे : अदिराज फ्लिम क्रिएशन निर्मित आणि चंद्रशेखर कुळसंगे दिग्दर्शित ‘मक्याची कमाल गोधडी धमाल‘ या मराठी चित्रपटाचे पोस्टर चित्रपट महामंडळचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांच्या हस्ते प्रसिद्ध करण्यात आले.

नवीपेठ येथील श्रमिक पत्रकार संघाच्या सभागृहात मंगळवारी (दि. ३०) झालेल्या कार्यक्रमाला अभिनेत्री मुक्ता पटवर्धन, नवनाथ गौड, स्वाती बेंडभर, रमेशजी गुप्ता, शीतल सोनावले, भरत शेलार, अरुण नागने, बाळासाहेब काकडे, मदन धायरे, वासुदेव वर्मा, उत्तमराव शिंदे, पप्पु मुलांनी आणि सखारामजी पोळ उपस्थित होते.

दिग्दर्शक चंद्रशेखर कुळसंगे म्हणाले, मक्या आणि खंड्या या दोन मित्रांभोवती चित्रपटाची कथा गुंफण्यात आली आहे. मक्याला कामाचा कंठाळा असून, त्याला पैशाची गरज भागविण्यासाठी लोकांकडून उसने पैसे घ्यावे लागते. मात्र, तो पैसे परत करतच नाही. एक दिवस सावकार वसुलीसाठी मक्याकडे येऊन एका महिन्यांच्या आत पैसे परत कर नाही, तर आम्ही तुझे हात पाय मोडू, अशी धमकी देतो. सावकाराच्या भीतीने मक्याची आई त्याला शहरामध्ये पाठवते. मात्र, मक्या शहरात न जाता आपल्या लहानपणाचा मित्र खंड्याच्या गावाला जातो. दरम्यान दोघाला गोसावी भेटतात. गोसावीने आपल्याला संदेश दिला म्हणून खंड्याला महाराज बनवून त्याच्या गावात घेऊन माळावरच्या महादेव मंदिरात बसवतो. खंड्याच्या कानात ब्लुटूथ बसवतो गावातील मानस महादेवाच्या दर्शनाला आले की, त्यांचे पूर्ण भविष्य खंड्या सांगतो. कारण मक्याला खंड्या फोनवरून आलेल्या मानसाविषयी सर्व माहिती सांगतो. लाल गोधडीमुळे श्रीमंत होणार असल्याचे खंड्याचे सांगतो. त्यामुळे प्रत्येकजण त्या गोधडीच्या मागे लागतो. त्यासाठी वाटेल तेव्हडे पैसे नागरिक पैसे देतात. त्यातून मक्या आपल्या सरपंच प्रियेसीच्या सहकार्याने गावाचा विकास साधतो. गावचा विकास कसा करता येते, याची कथा या चित्रपटातून मांडण्यात आली आहे,  असे कुळसंगे यांनी सांगितले.

‘मक्याची कमाल गोधडी धमाल‘ चित्रपटात लक्ष्मण जगदाळे, डॉ. सुयोग जुजगर, प्रतीक्षा वारकरी आणि स्नेहल पालकर यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. तर अभिनेता रामचंद्र धुमाळ, सुरेश कांबळे, सोपान राठोड, बाबूराव अर्दड, भागवत रक्ताटे, शैला पाटील, साधना टेकाळे, आश्‍विनी पवार, दिपाली जोशी, राणी पाटील, पुजा कांबळे, पुजा साळवे, दत्तात्रय गायकवाड,नवनाथ सांळुखे, रवि कांबळे, शेषराव गायकवाड, प्रमोद काविंदे, रवि ठाकूर, बॉबी हिवाळे, जानकीराम लिगसे, संतोष कन्हारे व सेन्हा कागणे हे कलाकार उपस्थित होते.