ब्रिटानिया न्युट्रिचॉईस तर्फे न्युट्रीप्लस ॲपच्या लॉंचची घोषणा

पुणे ४ एप्रिल २०२४:  ब्रिटानिया न्युट्रिचॉईस या भारतातील आघाडीच्या बिस्कीट ब्रॅन्ड तर्फे आज त्यांनी हेल्थ टेक क्षेत्रात प्रवेश करुन न्युट्रीप्लस ॲपची सुरुवात केल्याची घोषणा केली. ब्रिटानिया न्युट्रिचॉईसच्या या न्युट्रीप्लस ॲप चे डिझाईन हे ॲक्टिव्हो लॅब्सच्या सहकार्याने करण्यात आले असून ही कंपनी पुराव्यावर आधारीत आरोग्य आणि वेलबिईंग उपाय प्रदान करणारी कुशल कंपनी आहे. इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने नुकत्याच दिलेल्या अहवालानुसार असंसर्गजन्य रोगाचे  प्रमाण देशभरात मोठ्या प्रमाणावर आहे.क्वान्टिफाईड हेल्थ मुळे विविध संस्कृती, भाषा आणि भौगोलिक स्थानांमधील लोकांना दीर्घायुष्य आणि आरोग्यपूर्ण जीवन जगणे शक्य होते.  ॲक्टिव्हो लॅब्सच्या तंत्रज्ञाना मुळे सातत्याने आरोग्या विषयीचे घटक तपासता येतात 

ॲक्टिव्हो लॅब्सच्या अनुभवी डॉक्टर्स आणि वैज्ञानिकांनी तयार केलेले न्युट्रीप्लस ॲप हे पुराव्यावर आधारीत तंत्रज्ञानाचा वापर करुन वापरकर्त्यांना  निरोगी जीवनाकडे वाटचाल करण्यास सक्षम करते.  न्युट्रीप्लस ॲप मध्ये रोजचा न्युट्रीस्कोअर मिळतो, ज्यामध्ये एक स्कोअर इंडिकेटर हा वापरकर्त्याच्या अनेक घटकांनुसार जसे व्यायामाचा कालावधी आणि झोपेचा कालावधी तपासतो, ज्यामुळे वापरकर्त्यांना त्यांची एकंदरीत आरोग्याची स्थिती  जाणून घेता येते. 

एका हेल्थ स्कोअर मध्ये सुधारणेला ज्या क्षेत्रात वाव आहे ते दर्शवते ज्यामुळे व्यक्तीला त्याच्या वेलनेसच्या प्रवासाची पूर्ण कल्पना येते.  नमूद करण्याची गोष्ट अशी की न्यूट्रीप्लस हे कोणत्याही वेअरेबल्स वर अवलंबून रहात नाहीत, या सर्व गोष्टी शोधून काढण्यासाठी आपल्याला केवळ एक स्मार्टफोनची गरज असते ज्याच्या माध्यमातून आपण कार्य आणि पोषण या दोन्ही गोष्टी तपासू शकता.  न्युट्रीप्लस ॲप मध्ये सर्वसमावेश असे आठवड्याचे निष्कर्शही मिळतात ज्यामुळे वापरकर्त्यांना ते कोणत्याही भागात असोत त्यानुसार विशेष इन्साईट्स ही प्राप्त होतात.

ब्रिटानिया इंडस्ट्रीज चे चीफ मार्केटिंग ऑफिसर अमित दोशी यांनी सांगितले “ब्रिटानिया न्युट्रिचॉईस ने नेहमीच नाष्ट्याचे अधिक चांगले पर्याय शोधणार्या ग्राहकांच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यावर भर दिला आहे.  आता ग्राहक न्युट्रीप्लस ॲपला ब्रिटानियाच्या न्युट्रिचॉईस उत्पादनांच्या पॅक वरील क्यूआर कोड स्कॅन करुन डाऊनलोड करु शकतील, कारण हे पॅक भारतातील कोट्यावधी ग्राहकांच्या घरात पोहोचते.  आमचा असा विश्वास आहे की छोट्या, रोजच्या निवडीचा अदृश्य परिणाम होत असतो आणि न्युट्रीप्लस ॲप हे अशाच छोट्या पावलांचे द्योतक आहे जे कोट्यावधी भारतीय आरोग्य आणि जीवनशैली च्या दिशेने टाकत असतात.”

ॲक्टिव्हो लॅब्स चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सहसंस्थापक गौरब मुखर्जी म्हणाले  “ॲक्टिव्हो मध्ये आम्ही नेहमीच ब्रिटानिया सारख्या भविष्याकडे वाटचाल करणार्या संस्थे बरोबर सहकार्य करुन नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करत ते ज्या समाजात काम करतात त्यांच्या आरोग्यात सुधारणा करण्यावर आम्ही भर देत असतो.  पुढील प्रवास हा खूपच उत्साहवर्धक आहे आणि आंम्हाला खात्री आहे की ब्रिटानिया कडून रिअल टाईम हेल्थ डेटा अनलॉक केला जाईल आणि त्यामुळे भारतीयांना अधिक आरोग्यपूर्ण जीवन जगता येईल.”

 न्युट्रीप्लस ॲप मध्ये केवळ ग्राहकांना त्यांच्या आरोग्याची प्रगतीच तपासता येत नाही तर हे ॲप वापरकर्त्यांच्या प्रगतीचा आनंद वाटतात आणि त्यांना प्रोत्साहनही देते.  वापरकर्त्यांची प्रगती ही विविध न्यूट्रीस्कोअर लेव्हल्स जसे स्टार्टर, अचिव्हर, स्टार आणि प्रो ने मोजली जाते आणि त्यांना आकर्षक रिवॉर्ड्स आणि सूटही प्राप्त होते.  त्याच बरोबर त्यांना विविध फिटनेस आऊटलेट्स कडून आकर्षक व्हाऊचर्स तसेच २० हजार पॉईंट्स जमा झाल्यास आंतरराष्ट्रीय हॉलिडे जिंकण्याची संधी प्राप्त होते.  या ॲप मध्ये प्रत्येक महत्तवपूर्ण घडामोड साजरी होते आणि त्या घडामोडी नुसार त्याला प्रोत्साहन ही दिले जाते.