बुहूगुणी आहे विडयाचे पान  : मनीषा लहारे

174

केडगाव ( मनीषा लहारे ) : संपूर्ण भारतात विडयाचे पान पाहुण्यांच्या आदरतिथ्यासाठी प्रसिद्ध आहे. तसेच या पानांचा उपयोग पूजन कार्य, हवनामध्ये केला जातो. पान भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक असण्यासोबतच एक महत्त्वपूर्ण औषधीसुद्धा आहे. असे प्रतिपादन मनीषा लहारे यांनी केले ओअॅसिस इंग्लिश मिडिअम स्कूलच्या दांडिया समारंभ कार्यक्रमावेळी त्यांनी विद्याथ्र्यांशी संवाद साधला. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका शोभा भालसिंग, शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे बोलतांना लहारे म्हणल्या की, जेवणानंतर तोंडाची चव वाढवण्यासोबतच या पानांचा वापर करून विविध पारंपारिक औषधी उपाय केले जातात. विड्याचे पान खाल्ल्याने पचनसंस्था सुधारून शरीरात ऊर्जा निर्माण होऊन स्फूर्ती मिळते. वैज्ञानिक शोधानुसारही विडयाचे पान बुहूगुणी असल्याचे सिद्ध झाले आहे. प्रत्येक घरामध्ये बुहूगुणी विडयाच्या पानाचा वेल असणे आवश्यक आहे असे लहारे यांनी सांगितले. शाळेतील कार्यक्रम प्रसंगी मुख्यध्यापिक भलसिंग यांनी स्त्री शक्तीचे महत्व सांगून स्त्रीने स्वतःला कधीही गौण न समजता अखंड कार्यरत रहावे असे विद्यर्थिनींना मार्गदर्शन केले.