क्लासिक लेजंड्सद्वारे जावा मोटारसायकल्सच्या नवीन इंजिनाचे अनावरण

138

मुंबई, 12 ऑक्टोबर, 2018: 2015 साली स्थापन करण्यात आलेल्या क्लासिक लेजंड प्रायवेट लिमिटेड स्टार्टअपकडून क्लासिक लेजंड समजली जाणारी जावा मोटारसायकल लवकरच नवीन स्वरुपात बाजारात उतरवली जाणार आहे. भारतामध्ये जावा मोटारसायकल्सना समृध्द वारसा आणि परंपरा लाभली आहे. लवकरच भारतीय बाजारात उतरवण्यात येणाऱ्या जावा मोटारसायकल्सच्या इंजिनचे आज अनावरण करण्यात आले.

हार्ट ऑफ गोल्ड : सुवर्णयुगाचा साक्षीदार असणारी ही मोटारसायकल आता पुढील पिढीकडे आपला समृध्द वारसा सोपवण्यासाठी सज्ज झाली आहे. जावाच्या माध्यमातून तो सुवर्णकाळ पुन्हा पाहण्यास आम्हीही आतुर झालो आहे.

नवीन जावाचे इंजिन जुन्या जावाच्या इंजिनाप्रमाणेच सर्वांच्या अपेक्षांना खरे उतरणारे असेल.

प्रथम नवीन इंजिनच्या ठळक वैशिष्ट्यांवर एक नजर टाकू या. हे इंजिन 293सीसी, लिक्वीड कूल्ड आणि सिंगल सिलेंडर डीओएचसीचे आहे.परंतु केवळ इतक्या वैशिष्ट्यांवरच नवीन इंजिनच्या कार्यक्षमतेचे मुल्यमापन करता येणार नाही तर ते इंजिन 27 बीएचपी आणि 28 एनएम इतका टॉर्क उत्पन्न करते. सुलभ मिड रेंज आणि फ्लॅट टॉर्क कर्वमुळे विश्वसनीय आणि पावरफूल राईडचा अद्भूत अनुभव मिळतो. थोडक्यात सांगायचे तर आम्ही हे इंजिन तयार करताना उद्दीष्ट ठेवले होते ते म्हणजे त्यामध्ये मुळ जावाचा डीएनए असावा. ते क्लासिक असले तरी स्पोर्टीही असावे. त्यासोबतच ते संपूर्ण नवीन स्वरुपात असावे, असेही आम्हाला वाटत होते.

जगातील एक आघाडीचे इंजिन स्पेशालिस्ट असणाऱ्या इटलीच्या वारीस या ठिकाणी असणाऱ्या टेक्नीकल सेंटरमध्ये आम्ही फक्त फ्लॅट टॉर्क कर्व असणारे आणि सुलभ मिड रेंजचे इंजिनच बनवले नाही तर आयुष्यभर टिूक शकेल अशी मजबूत मोटारही बनवली आहे. तुकडे आणि तुकडे एकत्र करुन जावाचे इंजिन क्लासिक आणि स्पोर्टीही बनवण्यात आम्हाला यश आले.

आम्ही इंजिन बनवताना केवळ त्याच्या सौंदर्याचा किंवा पावर डिलिवरीचा विचार केला नाही तर जुन्या जावामधील काही अनोखी वैशिष्ट्येही त्यामध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. जुन्या जावा मोटारसायकलच्या इंजिनमध्ये वापरण्यात येणाऱ्या एक्झॉस्ट नोटमुळे त्याचा आवाज खूप वेगळा होता. नवीन इंजिनमध्येही आम्हाला तो आवाज हवा होता. परंतु तो एक्झॉस्ट नोट क्लासिक टू स्ट्रोक इंजिनमुळे होता. तो आधुनिक फोर स्ट्रोक इंजिनात समाविष्ट करण्याचे खूप मोठे आव्हान आमच्यापुढे होते. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी इटलीतील मवेरिकच्या साउंड इंजिनिअर्सनी खूप प्रयत्न केले. त्यासाठी असंख्य हार्मोनिक पाईप कॉम्बिनेशन आणि इतर अनेक पर्म्युटेशन्सचा अभ्यास करुन नवीन जावाच्या इंजिनसाठी नवीन आवाजाचा शोध लावला.

नवीन जावाचे इंजिन जुन्याची साधर्म्य दर्शवनारे दाखवून ते तितकेच भविष्यातीलही बनवण्याचा आमचा प्रयत्न होता. यामुळेच नवीन जावाचे इंजिन बीएस6 रेडी प्लॅटफार्मवर तयार करण्यात आले आहे. फ्यूएल इंजेक्शन गिअरबॉक्सशी ट्यून करुन मिळणाऱ्या पावरट्रेनमुळे क्लासिकपासून असणारी प्रत्येकाची अपेक्षा पूर्ण होउ शकेल, असे आम्हाला वाटते.