कालवा गळतीकडे पालिका प्रशासन, पाटबंधारे खात्याचे वारंवार लक्ष वेधले होते : नगरसेविका श्रीमती स्मिता वस्ते

133

पुणे : पर्वती पायथा _ दांडेकर पूल परिसरातून जाणाऱ्या खडकवासला धरणाच्या कालवा गळतीकडे पालिका प्रशासन, पाटबंधारे खात्याचे लक्ष वेधले होते , मात्र कार्यवाही झाली नाही, असे प्रभाग २९ क च्या नगरसेविका श्रीमती स्मिता वस्ते यांनी पत्रकाद्वारे कळवले आहे.

सिंहगड रस्ता परिसरात कालवा फुटल्याने झालेल्या हानीच्या पार्श्वभूमीवर श्रीमती वस्ते यांनी पालिका प्रशासन आणि पाटबंधारे खात्याशी केलेला पत्रव्यवहाराला उजाळा दिला आहे.

निवडून आल्यापासून सातत्याने आपण या समस्येकडे लक्ष वेधत होतो. प्रभाग समिती बैठकीत मुद्दा उपस्थित करीत होतो.गळती थांबवली नाही तर मोठी दुर्घटना घडू शकते, याचा इशाराच वस्ते यांनी २o जूनला पत्रातून पाटबंधारे खात्याला  दिला होता. तर पालिकेला २४ मे रोजी पत्र लिहून गांभीर्याने लक्ष देण्यास सुचवले होते.